आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Strong Opposition Makes All Shine And Good Managers Keep The Fear Of Defeat Alive; This Fear Is The Motivation For Victory

दिव्य मराठी विशेष:मजबूत विरोधकामुळे सर्वच चमकतात अन् चांगले व्यवस्थापक पराभवाची भीती जिवंत ठेवतात

दोहा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषक या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत एकूण ८ संघ विजेते ठरले आहेत. ब्राझील, जर्मनी, इटली, अर्जेंटिना, फ्रान्स, उरुग्वे, इंग्लंड आणि स्पेन हे संघ सर्वोत्तम असतील, तर त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. आम्ही या संघांतील खेळाडू आणि व्यवस्थापकांकडून जाणून घेतले की व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे कोणते गुण आहेत ज्यामुळे ते इतके यशस्वी होतात. अनेक भिन्न गोष्टी असूनही, या विजेत्यांना असा विश्वास होता की सामन्यातील आघाडीच्या संघाची श्रेष्ठता त्यांना अधिक चांगली बनवते. मजबूत प्रतिस्पर्ध्यांमुळे खेळाचा स्तर सतत उंचावतो.

{संघभावना व परस्पर समन्वय... ध्येय गाठण्यासाठी खेळाडूंची संघभावना, समन्वय सर्वात महत्त्वाचे आहेत. सर्वोत्तम संघांचे व्यवस्थापक त्यांच्या खेळाडूंमध्ये भीती निर्माण करतात. ती पराभवाची भीती असते. ती त्यांना सतर्क व प्रेरितही ठेवते. चांगली कामगिरी न झाल्यास ते खेळाडूंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलतात. त्यातून त्यांचे मनाेबल वाढते.

{वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न... कतारची आयाेजक म्हणून निवड सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात हाेती. व्यवस्थापक म्हणतात, वादामुळे खेळाडू तणावग्रस्त होतात, लक्ष विचलीत हाेते. त्यामुळे अनावश्यक तणावापासून दूर राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वादात न पडणे. त्यासाठी आम्ही अनभिज्ञ राहण्याचे धोरण स्वीकारलेे. त्याचा फायदाही झाला.

{माहिती आणि सतत अभिप्राय... सामना संपल्यानंतर व्यवस्थापक त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहतो. खेळाडूने काय चांगले केले, काेण कुठे चुकला आणि काय चांगले होऊ शकले, यावर खेळाडूंना अभिप्राय देतो. ताे माहिसीसह असतो. खेळ सुधारण्यासाठी ताे आवश्यक आहे. सतत अभिप्राय दिल्याने खेळाडू त्यांच्या चुका सुधारतात. सांघिक कामगिरी सुधारते. {संघात काेणी स्टार नाही आणि सगळेच स्टार... चांगल्या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समान असतात. काही एका सामन्यात चांगली कामगिरी करतात तर काही दुसऱ्यात. नेमार आणि हरिकेनसारखे सुपरस्टार संघातील सर्वांसोबत मत मांडतात. सर्वांसाेबत हे घडते. कुणाला विशेष वागणूक नसल्याने काेणातही न्यूनगंड नसताे. प्रत्येकाला सुपरस्टार बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

बातम्या आणखी आहेत...