आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनात पहाटे 3 वाजेचा विजयाचा नजारा:फुटबॉल विश्वविजेत्यांचे जोरदार स्वागत, मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा सन्मान, अवघे अर्जेंटिना होते जागे

ब्यूनस आयर्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा कपचा विश्वविजेता संघ स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 3 वाजता अर्जेंटिनात परतला. तेव्हा अवघा अर्जेंटिना देश जागा होता. मेसीच्या हातातील ट्रॉफी पाहून कोट्यवधी लोकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, अर्जेंटिनात मंगळवारी रात्री अर्जेंटिनात राष्ट्रीय सुटी घोषीत केलेली होती. मात्र रविवारपासूनच अवघा देश सुटीवर आहे. मेसीने ट्रॉफीसोबत झोपल्याचा फोटो शेअर केला. बेडवरच ट्रॉफीसोबत पोझही दिल्या. विजयाचा मेसीचा फोटो इन्स्टाग्रामवर 'मोस्ट-लाइक्ड' फोटो ठरला. त्याला सुमारे ६.३ कोटी लाइक आहे. एगच्या फोटोला ५.६ कोटी लाईक्स मिळाले.

एका चाहत्याने ट्विट केलेला व्हिडिओ जरूर पहा

फायनलमध्ये असा जिंकला अर्जेंटिना

  • 18 डिसेंबर रोजी झालेल्या फिफाच्या फायनल सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने हरविले. दोन्ही टीममध्ये हा सामना 3-3 च्या बरोबरीने झाला होता. ज्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये जाऊन निर्णय झाला.
  • फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या बाजूने कर्णधार लिओनेल मेसीने 2 गोल केले होते. तर फ्रान्सच्या वतीने किलियन एम्बाप्पेने गोलची हॅट्रीक केली होती. फायनलमध्ये गोलची हॅट्रीक करणारा एम्बाप्पे आत्तापर्यंतचे दुसरे खेळाडू ठरला आहे.

फिफा फायनलमध्ये करण्यात आलेले गोल

अर्जेंटिना टीमकडून
लियोनल मेसी - 23 व्या मिनटाला केले.
डी. मारिया - 36 व्या मिनिटाला केले.
लियोनेल मेसी - 108 व्या मिनिटाला केला.

ज्या ट्रॉफीचे स्वप्न पाहिले होते, ते सत्यात उतरल्यानंतर मेसीची सुखनिद्रा
ज्या ट्रॉफीचे स्वप्न पाहिले होते, ते सत्यात उतरल्यानंतर मेसीची सुखनिद्रा

फ्रांन्स टीमकडून
किलियन एम्बाप्पे - 80 व्या मिनिटाला
किलियन एम्बाप्पे - 81 व्या मिनिटाला
किलियन एम्बाप्पे - 118 व्या मिनिटाला

बातम्या आणखी आहेत...