आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:लेकसिटी चेस फेस्टिव्हलमध्ये सुदीप पाटील ठरला उपविजेता

क्रीडा प्रतिनिधी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर लेकसिटी चेस फेस्टिव्हल स्पर्धेत औरंगाबादच्या सुदीप मुकेश पाटीलने उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटात त्याने ९ पैकी ५.३ गुणांची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याचे ४३ एलो गुणांकन वाढून एकूण १३०० झाले आहे. या स्पर्धेत त्याने अनिल शिवपुरी (दिल्ली), मोहंमद इस्माईल सिद्दिकी (उत्तर प्रदेश), दर्श राठी (राजस्थान), तन्मय कुमार (गुजरात), मध्य प्रदेशच्या विनोद वर्मा (१५१५) यांना पराभूत केले.

तसेच त्याचा एक डाव बरोबरीत राहिला व ३ डावांत पराभव झाला. त्याच्या यशाबद्दल जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, विकास पालांडे, तेजस्विनी सागर, मिथुन वाघमारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...