आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेलाे इंडियातील पदक विजेती सुदेष्णा शिवणकर आणि यजमान पुण्याचा प्रणव गुरव बुधवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वात वेगवान धावपटू ठरले. त्यांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १०० मीटर गटात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. साताऱ्याच्या सुदेष्णाने ११.९२ सेकंदात महिलांच्या गटाची १०० मीटरची शर्यत पुर्ण करत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. प्रणवने पुुरुष गटातील १०० मीटरची रेस १०.५६ सेकंदात पूर्ण केली. यासह त्याने यजमान पुणे संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. तसेच निखिल पाटीलने (१०.६१ से) राैप्य व किरण भोसलेने (१०.७४ से) कांस्य पटकावले. महिलांच्या गटात मुंबईच्या सरोज शेट्टीने (१२.१३ से.) रौप्य आणि साताऱ्याच्या चैत्राली गुजरने (१२.३५ से.) कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांची ५ हजार मीटर शर्यतीत कोल्हापूरच्या विवेक मोरेने पहिले सुवर्ण जिंकले. त्याने हे अंतर १४ मिनिट ४७.८० सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. साेलापूरच्या आशिष आणि सुनीलने कुस्तीत सुवर्णपदक पटकावलेे. नागपूर, पुणे आणि बृहन्मुंबई बॅडमिंटन संघांनी पुरुष आणि महिला सांघिक सुवर्णपदके जिंकण्यासाठी संघर्षपूर्ण विजयांची नोंद केली. अनुभवी अनघा करंदीकरने १५ वर्षीय तारिणी सुरीच्या जोडीने सावंत आणि मनाली परुळेकर यांचा दुहेरीत २१-१९, २१-१५ असा पराभव करून आपल्या संघाला कायम राखले होते. समिया शाहवर २१-५, २१-७ असा विजय मिळविला
पुरुषांच्या अंतिम फेरीत पुण्याने एकेरीतील आपले वर्चस्व राखत ठाण्यावर ३-२ अशी मात केली. पुण्याच्या शटलर्सने एकेरीतील तीनही रबर्स जिंकले, तर ठाण्याने दोन्ही दुहेरी जिंकून अंतिम फेरी गाठली. वरुण कपूरला रोखण्याचा पुण्याचा गेम प्लॅन त्यांच्यासाठी चांगला ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.