आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरा बॅडमिंटन:सुकांत चॅम्पियन; भारताला पाच सुवर्णपदके

लिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सुकांत कदमने पेरू आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला. भारतीय संघाने या स्पर्धेत पाच सुवर्णपदकांची कमाई केली. यामध्ये निथ्या सिवान, मनदीप काैर यांनी महिला एकेरीच्या गटात प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले. नेहाल-जाेहानने पुरुष दुहेरी आणि पारूल परमार आणि वैशाली पटेलने महिला दुहेरीत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. सुकांतने फायनलमध्ये सिंगापूरच्या ची हाेआेंगवर मात केली. त्याने एसएल-४ च्या फायनलमध्ये २१-१४, २१-१५ ने विजय साकारला.

बातम्या आणखी आहेत...