आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sumar Gaelandaji; Dhaeni Made His Retirement Speech, 13 Wides And 3 Balls In The Match Against Lucknow

आयपीएल:सुमार गाेलंदाजी; धाेनीने केली निवृत्तीची भाषा, लखनऊविरुद्ध सामन्यात 13 वाइड व 3 नाे बाॅल

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध सामन्यातील सुमार गाेलंदाजीने आता महेंद्रसिंग धाेनीने निवृत्तीचे संकेत दिले. गाेलंदाजीचा दर्जा सुधारला नाही तर संघाला नव्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. आगामी सामन्यातील कामगिरीचा अंदाज घेऊन आता हा निर्णय घेतला जाणार आहे, अशा शब्दामध्ये धाेनीने निवृत्तीची आपली माहिती दिली. त्यामुळे कामगिरीचा दर्जा उंचवा किंवा नव्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज व्हावे, अशा कडक शब्दात त्याने आपल्या टीममधील युवा गाेलंदाजांना इशारा दिला आहे. चेन्नई संघाने गत सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर साेमवारी दणदणीत विजय संपादन केला. चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर खेळत असलेल्या चेन्नई संघाने लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊचा १२ धावांनी पराभव केला.

या सामन्यात चेन्नई संघाच्या गाेलंदाजांनी १३ वाइड आणि ३ नाे बाॅल टाकले. याच सुमार गाेलंदाजीवर कर्णधार धाेनीने आपला राेष व्यक्त केला. यातून त्याने थेट संघाचे कर्णधारपद साेडण्याचेही बाेलून दाखवले.