आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Suresh Raina Unfollows Chennai Super Kings On Twitter, In 'Bring Back Raina' Trend On Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रैना परत चर्चेत:सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्सला ट्विटरवर केले अनफॉलो, सोशल मीडियावर ‘ब्रिंग बॅक रैना’ट्रेंडमध्ये

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहत्यांच्या सोशल मीडिया कँपेनिंगने त्रस्त होऊन रैनाने सीएसकेला अनफॉलो केले

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना आयपीएलच्या या सीजनमध्ये खेळत नाहीये. परंतू, तो सतत चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवानंतर, रैनाला संघात परत आणण्याची मागणी ट्विटरवर ट्रेंड करत आहे. रैनाने शनिवारी, चेन्नई सुपर किंग्सला ट्विटरवर अनफॉलो केले आहे. रैना आयपीएल सुरू होण्यापूर्वी खासगी कारणास्तव दुबईवरुन माघारी आला होता.

अनफॉलो का केले ?

शुक्रवारी चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर रैनाला परत आणण्याची मागणी परत एकदा ट्रेंड करत आहे. बातम्यांनुसार याच सोशल मीडिया कँम्पेनिंगने त्रस्त होऊन रैनाने चेन्नई सुपर किंग्सला ट्विटरवर अनफॉलो केले आहे.

सीएसकेचे कोच स्टीफन फ्लेमिंगने रविवारी दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाल्यानंतर म्हटले होते की, रैना आणि रायडू नसल्यामुळे संघ विखुरला गेला आहे. नंतर रैनाच्या वापसीवर चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले होते की, रैनाची वापसी अवघड आहे.

बातम्या आणखी आहेत...