आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रैनाच्या भावाचा मृत्यू:दरोडेखोरांच्या हल्ल्यात काकांपाठोपाठ जखमी भावानेही सोडले प्राण

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता तर आत्या, आत्तेभाऊ गंभीर जखमी होते. दरम्यान, उपचार घेत असलेल्या रैनाच्या भावाचेही निधन झाल्याचे समोर आले आहे. स्वतः रैनाने ट्विटरद्वारे माहिती दिली आणि पंजाब पोलिसांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रैनाने ट्विटमध्ये लिहीले की, 'माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयावह होते. माझ्या काकांची निर्घृण हत्या करण्यात आली. माझी आत्या आणि दोघा आत्तेभाऊ गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने माझ्या आत्तेभावाचेही काल रात्री निधन झाले. माझ्या आत्याची प्रकृती अजूनही खूप गंभीर असून ती लाइफ सपोर्टवर आहे.'

'त्या रात्री नेमके काय झाले, हे अद्याप आम्हाला समजले नाही. मी पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो. हे घृणास्पद कृत्य कोणी केले, हे आम्हाला समजले पाहिजे. त्या गुन्हेगारांना सोडता कामा नये.'

नेमके काय प्रकरण आहे ?

पंजाबच्या पठाणकोटमध्ये राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर 28 ऑगस्टला दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रैनाच्या आत्याचे पती अशोक कुमार यांचा त्याच रात्री मृत्यू झाला होता.तसेच, रैनाची आत्या आशा देवी, तिच्या सासू सत्या देवी, आत्तेभाऊ अपिन आणि कौशल जखमी झाले. पण, रैनाच्या दोन आत्तेभावांपेकी एकाचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.