आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत कारच्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. याच दुखापतीमुळे त्याला जवळपास ९ महिन्यांपर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. यातून ताे यादरम्यान हाेणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आयपीएलसह सहा माेठ्या स्पर्धांना मुकणार आहे. या अपघातामध्ये त्याच्या गुडघा आणि टाचेला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला यातून पूर्णपणे फिट हाेण्यासाठी माेठा अवधी लागणार आहे. सध्या त्याच्या मुंबईतील काेकिलाबेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तसेच त्याच्यावर आता लवकरच लंडनमध्ये शस्त्रक्रिया हाेणार असल्याची चर्चा आहे. सध्या त्याला विश्रांतीची गरज आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे आता इतरांना त्याच्या भेटीसाठी राेखण्यात आले. यादरम्यान फक्त कुटुंबीयांनाच भेटीची परवानगी देण्यात आली आहे.
सहा माेठ्या स्पर्धांना मुकणार : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपातील आहे. यातून आता त्याला सावरण्यासाठी ९ महिन्यांचा दीर्घ असा कालावधी लागणार आहे. यादरम्यान ताे माेठ्या स्पर्धांना मुकणार आहे. यामध्ये खासकरून जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्धची वनडे, टी-२० मालिका, मार्च-एप्रिलदरम्यानची आॅस्ट्रेलियाविरुद्धची कसाेटी, वनडे मालिका, एप्रिल-मेदरम्यानची आयपीएल, जूनदरम्यानच्या टेस्ट वर्ल्ड चॅम्पिनयशिप सारख्या महत्वाच्या स्पर्धेचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.