आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Surya Became The Number One Player In The Short Form, Kohli Also Benefited

क्रमवारी:सूर्या छोट्या प्रकारात नंबर वन खेळाडू बनला, कोहलीचाही फायदा

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

३६० डिग्री शॉट खेळणारा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पाेहोचला. ३२ वर्षीय सूर्या फलंदाजी क्रमवारीत ८६३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने पाकिस्तानच्या मो. रिझवानला मागे टाकले. रिझवान ८४२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने टी-२० विश्वचषकातील चारपैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.

त्याचप्रमाणे विराट कोहलीला देखील एका स्थानाचा फायदा झाला. तो ६३८ गुणांसह १० व्या क्रमांकावर पोहोचला. कोहलीने विश्वचषकातील चारपैकी तीन डावांत अर्धशतके झळकावली आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी प्रत्येकी एका स्थानचे नुकसान झाले आहे. रोहित ६०१ गुणांसह १५ व्या स्थानी आणि राहुल ५८१ गुणांसह २२ व्या स्थानावर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...