आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sushilkumar For The Second Time As The President Of The School Games Federation

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:न्यायालयात सध्या काेणतेही प्रकरण नाही; अफवा पसरवून खेळाडूंचे नुकसान केले जाते!

रायपूर (शेखर झा)6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशीलकुमार दुसऱ्यांदा स्कूल गेम्स ऑफ फेडरेशनच्या अध्यक्षपदी

गुणवंत खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे कुटिल डावपेच आखले जात आहेत. यासाठी वेगवेगळ्या गाेष्टींच्या अफवा पसरवल्या जात अाहेत. त्यामुळे सध्या कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. फक्त अफवा पसरवून खेळाडूंचे नुकसान केले जात आहेे, असे करणाऱ्यांना मी कधीही माफ करणार नाही. आता दुसऱ्यांदा मला नेतृत्वाची संधी मिळाली नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडणार आहे, अशा शब्दांत दुसऱ्यांदा स्कूल गेम्स ऑफ फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सुशीलकुमारने आपली प्रतिक्रिया दिली. ऑलिम्पिक पदक विजेत्या या मल्लाची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान त्याने आपल्या आगामी योजनेबद्दलची माहिती दिली.

टाेकियाे ऑलिम्पिकसाठीची तयारी कशी सुरू आहे, यात सहभागी हाेणार का? मी आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलाे आहे. त्यामुळे माेठ्या स्पर्धेची तयारी कशी करायची, हे आता मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मात्र, आगामी स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, हे मी नव्हे, गुरुजी निश्चित करतात. त्यामुळे त्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मी तयारीला सुरुवात करणार आहे.

एसजीएफअायच्या कार्यकारिणीबाबत दाेन वेळा निवडणुका झाल्या?
पहिल्या गटाने स्पोर्ट‌्स काेडच्या नियमाचे पालन केले नाही. त्यामुळेच त्यांच्या निवडणुकीला केंद्र सरकारने मंजुरी दिली नाही. त्यामुळे आम्हाला नियमाला धरून नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या. दुसऱ्या गटाचे लाेक हे नुसतेच खेळाडूंचे नुकसान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या अाहेत. त्याचा निश्चित माेठा फटका खेळाडूंना बसत आहे. मात्र, आता हे सर्व चित्र स्पष्ट करण्यासाठी मी कसून मेहनत घेणार आहे.

एसजीएफआयच्या स्पर्धा कधी हाेणार ?
आम्ही सर्वांनी मिळून काेराेना महामारीच्या संकटाचा विचार करून एक याेजना तयारी केली आहे. त्यामुळे सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्ही या स्पर्धेचे आयाेजन करणार अाहाेत. त्याची लवकरच घाेषणा हाेईल.

तुम्ही निवृत्ती घेतलेली नाही. खेळाडू व प्रशासकाची दुहेरी भूमिका कशी बजावत आहात? त्याचा कामगिरीवर काही परिणाम?
मी २००८ पासून सेकंड क्लास ऑफिसर आहे. त्यामुळे मला खेळाबरोबरच प्रशासकाच्या कार्याची माहिती आहे. मी काम आणि खेळामध्ये याेग्य प्रकारे सांगड घालताे. त्यामुळे मला काम करताना दाेन्ही भूमिका यशस्वीपणे बजावता येतात. एके दिवशी किती सराव करायचा आणि किती काम करायचे, या दाेन्हीचे प्लॅनिंग मी वेगवेगळ्या प्रकारे करताे.

तुम्ही राष्ट्रीय चाचणी स्पर्धेतून माघार घेतली?
राष्ट्रीय निवड चाचणीची स्पर्धा आधीच आटाेपली हाेती. त्यामुळे मला यात सहभागी हाेता आले नाही. आता आगामी स्पर्धेची मी कसून तयारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...