आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Suved Parkar's Double Century In His Debut; Mumbai's First Innings Declared At 647 For 8, Equaling The Coach's Record

रणजी ट्रॉफी:पदार्पणात सुवेद पारकरचे द्विशतक; कोचच्या विक्रमाशी साधली बरोबरी, 8 बाद 647 धावांवर मुंबईचा पहिला डाव घोषित

अल्लूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई संघाच्या युवा फलंदाज सुवेद पारकरने (२५२) रणजी ट्रॉफीच्या पदार्पण सामन्यात झंझावाती द्विशतक साजरे केले. याशिवाय सरफराजने (१५३) शतक आणि शम्स मुलानीने (५९) अर्धशतकी खेळीच्या मुंबई संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंडसमोर धावांचा डाेंगर उभा केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने आठ बाद ६४७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात उत्तराखंड संघाची निराशाजनक सुरुवात झाली. टीमने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ३९ धावा काढल्या. अद्याप ६०८ धावांनी पिछाडीवर असलेल्या उत्तराखंड टीमचा सलामीवीर कमल सिंग (२१) आणि कुणाल चंदेला (८) मैदानावर कायम आहेत. मुंबई संघाकडून तुषार देशपांडे व मोहित अवस्थीने प्रत्येकी एक बळी घेतला.

सरफराज-सुवेदची २६७ धावांची भागीदारी
मुंबई संघाकडून फाॅर्मात असलेल्या सुवेद पारकर आणि सरफराजने पहिला डाव गाजवला. त्यांनी उत्तराखंडची सुमार गाेलंदाजी फाेडून काढत चौथ्या गड्यासाठी विक्रमी २६७ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान सरफराजने शतक झळकावले. मयंक मि‌‌श्राने ही जाेडी फाेडली. त्याने सरफराजला बाद केले. त्यानंतर सुवेद हा आठव्य विकेटच्या रुपाने पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४४७ चेंडूंत २१ चौकार आणि ४ षटकारांसह २५२ धावा काढल्या. मुंबई संघाने कालच्या ३ बाद ३०४ धावांवरून मंगळवारी दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. सुवेद आणि सरफराजने आपला झंझावात कायम ठेवला.

अमोलच्या १९९४ मध्ये पदार्पणात २६० धावा
सुवेदने आता पदार्पणात द्विशतक साजरे करताना मुंबईच्या अमोल मुजुमदारच्या १९९३-९४ मधील कामगिरीला उजाळा दिला. अमोलने यादरम्यान फरीदाबादमध्ये हरियाणा संघाविरुद्ध२६० धावांची खेळी केली होती. अद्यापही हा विक्रम कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...