आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Suved's Unbeaten Century Armaan, Sarfaraz's Thunderous Half Century, Mumbai's 304 For 3 Against Uttarakhand

रणजी ट्रॉफी:सुवेदचे नाबाद शतक - अरमान, सरफराजचे झंझावाती अर्धशतक, उत्तराखंड संघाविरुद्ध मुंबई संघाच्या 3 बाद 304 धावा

अल्लूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुवेद पारकरच्या (१०४) नाबाद शतकापाठाेपाठ युवा फलंदाज अरमान जाफर (६०) आणि सरफराज खानच्या (नाबाद ६९) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर मुंबई संघाने साेमवारी रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंडविरुद्ध दमदार सुरुवात केली. मुंबई संघाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यामध्ये ३०४ धावा काढल्या आहेत. फाॅर्मात असलेला सुवेद आणि सरफराज मैदानावर कायम आहेत. उत्तराखंड संघाकडून दीपक धाेपळाची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज बाद केले. त्याने १८ षटकांत ५३ धावा देताना तीन बळी घेतले. त्यानंतर दिवसभरात उत्तराखंडच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.

नाणेफेक जिंकून मुंबई संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार पृथ्वी शाॅचा (२१) मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यापाठाेपाठ आयपीएल गाजवणारा यशस्वी जैस्वाल (३५) बाद झाला.

अरमान-सुवेदची शतकी भागीदारी : मुंबई संघाचा डाव सावरताना अरमान जाफर आणि सुवेद पारकरने झंझावाती खेळी केली. या दाेघांनी उत्तराखंडची सुमार गोलंदाजी फाेडून काढताना तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दरम्यान, शानदार अर्धशतक साजरे करून अरमान जाफर बाद झाला.

बातम्या आणखी आहेत...