आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघाला कांस्य:औरंगाबादच्या स्वप्निल, विशालचे माेलाचे याेगदान

अैरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र संघाने नुकत्याच ग्वालियर येथे झालेल्या १६ व्या राष्ट्रीय फ्लाेअरबाॅल स्पर्धेत कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत पदकाचा मानकरी ठरला. संघाच्या या यशामध्ये अैरंगाबादच्या स्वप्निल चिंतामण गुडेकर व विशाल सुकलाल जाधव यांचे माेलाचे याेगदान ठरले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पदकाचे माेठे यश संपादन करता आले. भारतीय फ्लोअरबॉल फेडरेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते.

महाराष्ट्र संघाने स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी करताना दमदार सुरुवात केली. यातून महाराष्ट्र संघाने पदकाचा पल्ला गाठताना छत्तीसगड (१०-१ गोल), तामिळनाडू (९-० गोल), पंजाब (१-०), उत्तराखंड (५-२) या संघांवर शानदार विजय संपादन केला. त्यामुळे संघाला कांस्यपदकावर नाव काेरता आले. औरंगाबादच्या स्वप्निलने संघामध्ये उत्तम डिफेंडर म्हणून आपली चमकदार कामगिरी बजावली. तसेच विशालची गाेलरक्षकाची भूमिका लक्षवेधी ठरली.

पदक विजेत्या महाराष्ट्र संघाचा कुलगुरू प्रा. खेडकर, मुख्य पंच जितेंद्र सिंग, फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र आर्या, सहसचिव प्रा. रवींद्र चोथवे यांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला. पदक विजेत्या महाराष्ट्र संघ आणि स्वप्नील-विशालवर काैतुकाचा वर्षाव केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...