आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूरचा युवा नेमबाज स्वप्निल कुसाळेने आपली लय कायम ठेवताना शनिवारी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपली सहकारी आशी चौकसेसोबत मिश्र गटाच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या जोडीने फायनलमध्ये युक्रेनच्या सेरही-दरियाला पराभूत केले. स्वप्निल-आशीने १६-१२ ने मात करून सुवर्णपदकाचा वेध घेतला.
यासह स्वप्निलने विश्वचषकात पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने यंदाच्या या स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावे केले. भारतीय संघाने पदकतालिकेत दुसऱ्या स्थानी धडक मारली. भारताच्या नावे दाेन सुवर्ण आणि तीन राैप्यसह एकूण पाच पदकांची नोंद आहे.
स्वप्निलची लक्षवेधी कामगिरी
स्वप्निलने सातत्य ठेवत बाकू येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धा गाजवली. त्याने पुरुष रायफल थ्री पोझिशन व सांघिक गटात प्रत्येकी एक रौप्य पटकावले. यासह त्याने दोन पदके जिंकली. त्यानंतर त्याने आशीसोबत थ्री पोझिशन रायफल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.