आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जेवताना इगा स्वातेकने नाओमी ओसाकाला म्हटले होते की, टेनिसमध्ये तिला आपले भविष्य दिसत नाही, त्यामुळे ती पुन्हा महाविद्यालयात जाण्याचा विचार करत आहे. हे ऐकल्यानंतर ओसाकाने म्हटले की,‘तू या खेळात खूप चांगली खेळते, केवळ आपली ऊर्जा असे विचार करण्यात वाया घालू नये.’ आता स्वातेकने ओसाकाच्या अपेक्षानुसार कामगिरी करत तिलाच मियामी ओपनच्या अंतिम फेरीत ६-४, ६-० ने १ तास १४ मिनिटात हरवले. हा पोलंडच्या स्वातेकचा सत्रातील सलग १७ वा विजय ठरला. एका सत्रात सलग तिसरी डब्ल्यूटीए १००० स्पर्धा जिंकणारी २० वर्षीय स्वातेक सर्वात युवा खेळाडू बनली. स्वातेक एका सत्रात सलग ३ किंवा अधिक डब्ल्यूटीए १००० स्पर्धा जिंकणारी सेरेना व वोज्नयाकीनंतर तिसरी खेळाडू बनली. यापूर्वी, स्वातेकने फेब्रुवारीत दोहा ओपन जिंकली व २ आठवड्यांपूर्वी इंडियन वेल्सचा किताब आपल्या नावे केला होता. त्याचबरोबर स्वातेक ‘शायनिंग डबल’ नावाने प्रसिद्ध इंडियन वेल्स आणि मियामी ओपन एकाच सत्रात जिंकणारी स्वातेक चौथी महिला खेळाडू बनली.
आज क्रमवारीत अव्वलस्थानी येणार स्वातेक
सामन्यानंतर नाओमी व स्वातेकने एकमेकांची स्तुती केली. स्वातेकने नाओमीला आपली प्रेरणास्थान असल्याचे म्हणत, आपल्या प्रेरणेचे वर्णन करताना ती असल्याने आपल्या खेळ अधिक चांगला होतो, त्यामुळे या खेळापासून कधीही दूर जाऊ नकाे, अशी विनंती केली. सोमवारी स्वातेक अधिकृतपणे क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.