आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Syed Hadi 7 sport Champion, Hence The Name 'Rainbow Hadi' | Marathi News

क्रीडा विश्वातील अविस्मरणीय किस्से:सय्यद हादी 7 खेळांचे चॅम्पियन, त्यामुळे नाव पडले ‘रेनबो हादी’

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुआयामी खेळाडू सय्यद मोहंमद हादी ७ खेळांमध्ये पारंगत होते, त्यामुळे त्यांचे ‘रेनबो हादी’ नाव पडले. त्यांनी केवळ क्रिकेट व टेनिसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले, तर हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ व पोलोमध्येही ते तज्ज्ञ खेळाडू होते. १९३०-४० च्या दशकात त्यांच्यासारखे कुशल खेळाडू नव्हते. त्यांचे वडील हैदराबाद राज्य सैन्यदलाचे कॅप्टन होते. हादी केवळ २ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. हैदराबादच्या निजाम दरबारातील माजी प्रधानमंत्री असमन जाहच्या कुटुंबाने त्यांचे पालन केले. काही काळानंतर ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. केम्ब्रिज विद्यापीठात फुटबॉल, हॉकी, टेनिस संघाकडून खेळले.

त्यांनी १९२४ व १९२५ मध्ये डेव्हिस कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. विम्बल्डनमध्ये ५ वर्षे खेळले व १९२५ मध्ये दुहेरीच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचले. हादी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणारे भारताचे पहिले टेनिसपटू आहेत. जेव्हा १९३४ मध्ये रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली, तेव्हा हादी शतक करणारे पहिले फलंदाज बनले. त्यांनी लाला अमरनाथसह ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनौपचारिक कसोटीदेखील खेळली. ते हैदराबाद क्रिकेट व फुटबॉल संघाचे संस्थापक सदस्य होते. त्यांची चौफेर कामगिरी व्यावसायिक क्रीडा क्षेत्रात जवळपास अकल्पनीय वाटते.

बातम्या आणखी आहेत...