आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-20:श्रेयसच्या अर्धशतकाने मुंबई फायनलमध्ये

काेलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रेयस अय्यरने (७३) झंझावाती अर्धशतकी खेळीतून मुंबई संघाचा सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेश निश्चित केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने गुरुवारी एेतिहासिक ईडन गार्डनवर अक्षय वाडकरच्या विदर्भ संघाला धूळ चारली. मुंबई संघाने १६.५ षटकांत ५ गड्यांनी उपांत्य सामना जिंकला. विदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मुंबईने ५ विकेट आणि १९ चेंडू राखून विजयश्री खेचून आणली. शनिवारी मुंबई व हिमाचल प्रदेश यांच्यात किताबासाठी अंतिम सामना हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...