आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T 20 Match | Marathi News | Team India | West Indies Vs Tem India | India Vs West Indies T20 Series From Today; The Opening Match Evening. From 7.30 P.m.

भारत vs वेस्ट इंडीज:टी-20 मालिका आजपासून; विंडीजविरुद्ध सलग चौथ्या मालिका विजयाची यजमान भारताला संधी, सलामी सामना संध्या. 7.30 वाजेपासून

कोलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विंडीजविरुद्ध सलग चौथ्या मालिका विजयाची यजमान भारताला संधी
  • ईडन गार्डनवर चारपैकी तीन सामन्यांत यजमान संघ विजयी

वनडे मालिका विजयाने फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता पाहुण्या विंडीजविरुद्ध टी-२० सिरीजही आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाला आता विंडीजविरुद्ध सलग चौथ्या मालिका विजयाची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. सलामी सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर रंगणार आहे. डिसेंबर २०१९ नंतर पहिल्यांदाच टी-२० सामन्यात हे संघ समाेरासमाेर येणार आहेत. विंडीजच्या नावे टी-२० चे दाेन विश्वविजेतेपद नाेंद आहे. तसेच विंडीज संघात जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, विंडीज संघाची भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी ठरली आहे.

काेहलीच्या मुद्द्यावर राेहित भडकला
संयमी आणि शांत असलेल्या कर्णधार राेहितचा पत्रकार परिषदेत संयम सुटला आणि ताे विराट काेहलीच्या सुमार खेळीवर प्रश्न विचारणाऱ्यावर चांगलाच भडकला. ‘तुम्ही सगळे शांत बसलात तरच काेहलीला चांगली कामगिरी करता येईल. यातून सगळे काही सुरळीत हाेईल. यासाठी तुम्ही सगळ्यांनी आता विराट काेहलीला एकटे साेडण्याची गरज आहे. ताे लवकरच फाॅर्मात येईल,’ असे ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...