आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T 20 World Cup 2021: Hasan Ali Was Trolled For Dropping The Catch In The Semi Final Match, Said I Did Not Live Up To Your Expectations

पाकिस्तानी क्रिकेटपटूने मागितली माफी:कॅच सोडल्यामुळे ट्रोल झाला हसन अली, म्हणाला- मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला आणि त्यानंतर वेडने सलग तीन चेंडूत षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यानंतर हसन अली आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले.

हसन अलीचा माफीनामा
आता हसन अलीने आपल्या चुकीबद्दल पाकिस्तान क्रिकेटप्रेमींची माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, 'मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्याबद्दल खूप निराश आहात कारण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, परंतु माझ्यापेक्षा जास्त दुःखी क्वचितच कोणी असेल.

माझ्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत म्हणून निराश होऊ नका. मला माझ्या देशाची प्रत्येक स्तरावर सेवा करायची आहे. मी पुन्हा एकदा मेहनत करायला सुरुवात केली आहे. मी तुमच्यासमोर आणखी मजबूत होऊन येईन. आपल्या सुंदर संदेश आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मला त्याची खूप गरज होती.'

भारतातील राहणारी आहे हसनची पत्नी
हसनची पत्नी भारतातील आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन आणि त्याची भारतीय पत्नी सामियाला ट्रोलर्सनी सोशल मीडियावर घाणेरडे अपशब्द लिहिले. हसनला तर पाकिस्तानात 'देशद्रोही' म्हटले जात होते. काहींनी तर ट्विट करून हसनला येताच गोळ्या घाला, असे म्हटले होते.

सामिया ही भारतातील हरियाणातील नूह जिल्ह्यातील चंदेनी गावची रहिवासी आहे. ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर आहे. त्यांचे कुटुंब फरिदाबाद येथे गेल्या 15 वर्षांपासून राहत आहे.

19 व्या षटकात पलटली मॅच
उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 12 चेंडूत 22 धावांची गरज होती. 19 वे षटक शाहीन आफ्रिदी घेऊन आला आणि आणि तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडने डीप मिड-विकेटवर मोठा शॉट मारला. चेंडू हवेत होता आणि हसन अली चेंडूचा पाठलाग करून धावला.

अली हा झेल पकडेल आणि पाकिस्तानचा विजयाचा मार्ग सुकर करेल, असे पाकिस्तानी चाहत्यांना वाटत होते, पण तसे झाले नाही. हसन अलीने हा झेल सोडला आणि तो पाकिस्तानच्या पराभवाचे कारण ठरला.

बातम्या आणखी आहेत...