आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • T 20 World Cup To Be Postponed To 2022, IPL In October Window ICC Board Meeting News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी बोर्ड मीटिंग:टी-20 वर्ल्ड कप 2022 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होण्याची शक्यता

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 वर्ल्ड कप 2022 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होण्याची शक्यता

या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 2022 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. ही टूर्नामेंट 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत खेळवण्यात येण्याचे ठरले होते. आता टुर्नामेंट पुढे ढकलण्याचा निर्णय उद्या होणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (आयसीसी) च्या बोर्ड टेले-कॉन्फ्रेंसिंग मीटिंगमध्ये घेतला जाऊ शकतो. परंतू, आयसीसीच्या एका प्रवक्त्याने टुर्नामेंट पुढे ढकलण्याच्या सर्व शक्यतांचे खंडन केले आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 29 मार्च पासून होणार होता, कोरोनामुळे त्याला अनिश्चित काळासाठी टाळण्यात आले.

आयसीसीने वर्ल्ड कप रद्द करण्याच्या बातम्यांचे खंडन केले

आयसीसीच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘‘आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. टूर्नामेंटबाबत शेड्यूलनुसार ऑस्ट्रेलियामध्ये सर्व तयारी सुरू आहेत. याबाबत आयसीसी बोर्ड मीटिंगमध्ये निर्णय घेतला जाईल.’’

‘आयसीसी आणि ऑस्ट्रेलियाला टूर्नामेंट नकोय’

आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने वृत्तसंस्थेला सांगितले की,‘‘गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये टी-20 वर्ल्ड कप तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा कठीण प्रसंगी टुर्नामेंट होण्याची शक्यता फार कमी आहे.’’

बातम्या आणखी आहेत...