आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T 20 World Cup: Today Pakistan Need To Win Against Africa, Match At 1.30 Pm

टी-20 विश्वचषक:आज द. आफ्रिकेविरुद्ध पाकला विजय हवाच, सामना दुपारी 1.30 वाजता

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० विश्वचषकात गुरुवारी पाकिस्तानसाठी ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती आहे. स्पर्धेतील ३६ व्या सामन्यात पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर दुपारी १.३० वाजेपासून खेळवला जाईल. द. आफ्रिकेने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्याचबरोबर पाकिस्तानने तीनपैकी एक सामना जिंकला आहे, तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला.

बाद फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचे द. आफ्रिकेविरुद्ध परडे जड आहे. दोन्ही संघ तीन वेळा समोरासमोर आले आणि तिन्ही वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर जर आपण दोन्ही संघांच्या टी-२० मधील एकूण कामगिरीबद्दल विचार केल्यास दोन्ही संघांमध्ये निकराची स्पर्धा आहे. २१ सामन्यांत पाकिस्तानने ११, तर द. आफ्रिकेने १० जिंकले आहेत. दरम्यान, सध्याच्या विश्वचषकात फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला तर द. आफ्रिकेचे खेळाडू लयीत दिसत असताना पाकिस्तानला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही सुधारणा करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...