आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T 20world Cup Cancelled; The Tournament Will Take Place In October November 2021 And 2022 For Two Consecutive Years

अखेर टी-20 वर्ल्ड कप रद्द:2022 मध्ये आयाेजन; सलग तीन वर्ष विश्वचषक स्पर्धा, आयपीएलचा मार्ग माेकळा

दुबई/मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2022 मध्ये आयाेजन; सलग तीन वर्ष विश्वचषक स्पर्धा, आयपीएलचा मार्ग माेकळा

काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन आयसीसीने आता यंदा आॅस्ट्रेलियात नाेव्हेंबरदरम्यान हाेणारा टी-२० चा वर्ल्डकप स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता ही विश्वचषक स्पर्धा दाेन वर्षांनी २०२२ मध्ये आयाेजित केली जाईल. यातून आता २०२१ ते २०२३ दरम्यान सलग तीन वर्ष विश्वचषक स्पर्धांचे आयाेजन केले जाईल. यात दाेन टी-२० व एका वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे.या विश्वचषकाच्या स्थगितीने आता आयपीएल आयाेजनाचा मार्ग माेकळा झाला आहे. त्यामुळे आता संकटात सापडलेली यंदाच्या सत्रातील आयपीएल आता आयाेजित केली जाण्याची तयारी जाेमात सुरू आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या लीगसाठी सखाेल चर्चा केली. यातून आयपीएल ही २६ सप्टेंबर ते ८ नाेव्हेंबरदरम्यान हाेण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआयकडून काेणत्याही प्रकारची अधिकृत अशी घाेषणा केलेली नाही. आयाेजनाला आता प्रक्षेपणकर्त्यांनी विराेध दर्शवला आहे. आयपीएल दिवाळीपर्यंत आयाेजित करावी, अशी ब्राॅडकास्टरची मागणी आहे. मात्र, दिवाळीदरम्यान रेटिंग कमी मिळत असल्याचा सल्ला बीसीसीआयने दिला.

दिवाळे राेखण्यासाठी अट्टहास : सध्या काेराेनाच्या महामारीमुळे यंदा ब्राॅडकास्टर अडचणीत सापडलेले आहेत. यातच आता आयपीएल ही टी-२० स्पर्धा दिवाळीपूर्वीच आटाेपण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. मात्र, याला ब्राॅडकास्टरकडून विराेध दर्शवला जात आहे. या दिवाळीदरम्यान माेठ्या प्रमाणात जाहिराती मिळतील आणि बिझनेस करता येईल हाच प्रक्षेपणकर्त्यांचा उद्देश आहे. मात्र, याला बीसीसीआयने सल्ला दिला.

खेळाडूंच्या विश्रांतीला बाेर्डाची पसंती : बीसीसीआयने खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक थकव्याचा विचार केला. खेळाडूंना आयपीएलनंतर विश्रांती मिळावी असा बीसीसीआयचा प्लॅन आहे. रेटिंगचा मुद्दा समाेर करताना बीसीसीआयने दिवाळीपूर्वीच आयपीएल आयाेजनावर अधिक भक दिला. यातून दिवाळीदरम्यान खेळाडू विश्रांती घेतील व त्यानंतर टीम डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलियाचा दाैरा करू शकेल.

पीसीबीने परत केले चाहत्यांचे २.७ काेटी
काेराेनाच्या संकटाचा सर्वात माेठा फटका पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) बसला. पीसीबीच्या वतीने पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) आयाेजन करण्यात आले. मात्र, यादरम्यान हे हाेऊ शकले नाही. चाहत्यांनी या लीगच्या सामन्यांसाठी तिकिटे खरेदी केली हाेती. आता ही लीग हाेऊ शकली नाही. यातून पीसीबी आता चाहत्यांचे २.७ काेटी रुपये परत करत आहेे. १३ जुलैपर्यंत पहिल्या फेरीतील तिकिटांची रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...