आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs New Zealand | T20 After 3 Years At Eden; Bench Strength Opportunity, India New Zealand 3rd Match Today

भारत VS न्यूझीलंड:ईडनवर 3 वर्षांनंतर टी-20; बेंच स्ट्रेंथला मिळणार संधी, भारत-न्यूझीलंड आज तिसरा सामना

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता मालिकेत पाहुण्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा शेवटचा टी- २० सामना आज रविवारी हाेणार आहे. काेलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील.

ईडन गार्डन मैदानावर तीन वर्षांनंतर टी- २० सामना हाेणार आहे. या सामन्यादरम्यान बेंच स्ट्रेंथ युवा खेळाडूंना भारतीय संघामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान यजमान संघाकडून ईशान किशन, आवेश खान आणि युजवेंद्र चहल खेळताना दिसणार आहेत.

दुसऱ्या सामन्यात कर्णधार राेहित शर्मा आणि सलामीवीर लाेकेश राहुलने शतकी भागीदारी केली. तसेच पदार्पणात गाेलंदाज हर्षल पटेलची कामगिरी काैतुकास्पद ठरली. तसेच व्यंकटेश अय्यर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही आता चांगली खेळी करत आहेत. ऋषभने सलग दाेन वेळा सर्वाेत्तम खेळीतून टीमचा विजय निश्चित केला.

राेहितचे नेतृत्व कणखर, टीमचे पारडे जड : सध्या नव्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा राेहितकडे साेपवण्यात आली. त्याने कुशल नेतृत्वातून टीम इंडियाला आपल्या घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवून दिला. यातून टीम इंडियाचे आता तिसऱ्या सामन्यातही विजयाचे पारडे जड मानले जात आहे. तसेच नवीन कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वामुुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गाेलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या मालिका विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे आता हीच लय कायम ठेवण्यासाठी यजमान टीम इंडिया उत्सुक आहे.

व्यग्र वेळापत्रकाने किवीज अडचणीत; सुमार खेळीचा फटकाविश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंड टीमला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. खेळाडूंमध्ये प्रत्युत्तराच्या खेळीचा अभाव दिसून आला. कारण सध्या न्यूझीलंड टीम सातत्याने खेळत आहे. व्यग्र वेळापत्रकाचा या टीमला माेठा फटका बसल्याची चर्चा आहे. कारण विश्वचषकानंतर टीम आता भारत दाैऱ्यावर आली आहे.

त्यामुळेच टीमला या दाैऱ्यात अद्याप समाधानकारक खेळी करता आली नाही. यातूनच टीमला सलग दाेन सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यादरम्यान अनुभवी कर्णधार विलियम्सनचीही माेठी उणीव टीमला जाणवत आहे. यातून सध्या टीमच्या खेळाडूंना मानसिक आणि शारीरिक स्वरुपातील थकवाही आलेला आहे. याचा माेठा फटका टीमला बसत असल्याचेही तज्ञांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...