आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 | India |Manchester United Defeat; Emergency Meeting In 2 Hours; Coach Gunner's Dismissal, Zidane's First Choice For Team Owner Glazer

नवीन सुरुवात:मँचेस्टर युनायटेडचा पराभव जिव्हारी; 2 तासांत तातडीची बैठक; कोच गनरची हकालपट्टी, झिदानला संघमालक ग्लेजरची पहिली पसंती

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनायटेडविररुद्ध सामन्यात वॉटफोर्डने 4-1 ने मिळवला सनसनाटी विजय, सर्वोत्तम खेळीतून वेधले लक्ष

मँचेस्टर युनायटेडचा लाजिरवाणा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे तातडीने माेठे निर्णय घेण्यात आले. टीमच्या याच पराभवाच्या मालिकेचा माेठा फटका प्रशिक्षक आले गनर यांना बसला. युनायटेडने तत्काळ बैठक बाेलावली आणि प्रशिक्षक पदावरून ओले यांच्या हकालपट्टीचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गनर यांना सात सामन्यात सहा वेळा पराभवाला सामाेऱ्या जाणाऱ्या युनायटेडचे प्रशिक्षकपद साेडावे लागले.

आता युनायटेडला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी झिदान यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे साेपवली जाण्याची शक्यता आहे. कारण या पदी झिदानच्या नियुक्तीला युनायटेड क्लबचे मालक ग्लेजर यांनीच पहिली पसंती दर्शवली. त्यामुळे लवकरच झिदानकडे या पदाची सूत्रे साेपवली जाण्याचे चित्र आहे. यावर लवकरच शिक्कामाेर्तब हाेईल. मात्र, सत्राच्या मध्येच अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारण्यास झिदान यांनी नकार दर्शवला आहे.

याशिवाय त्यांना ब्रेक घेण्यासाठी पत्नी वेराेनिकनेही विनंती केली आहे. यातूनच आता फ्रान्सचे प्रशिक्षक झिदानचा निर्णयच या परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, फ्रान्सच्या या प्रशिक्षकांना सध्या प्रचंड मागणी आहे. कारण, त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमला फुटबाॅलच्या विश्वात आपला दबदबा निर्माण करता येताे.

त्यामुळेच त्यांना आपल्या क्लबसाेबत करारबद्ध करण्यासाठी युनायटेडठठचा संघ मालक ग्लेजर सध्या चांगला आग्रही आहे. यासाठी माेठ्या रक्कमेची किंमतही माेजण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. यातूनच लवकरच हा महागडा करार हाेण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच चर्चा हाेण्याचे चित्र आहे. यातून लवकरच माेठा निर्णय हाेऊ शकेल.

नवख्या वाॅटफाेर्डचा सनसनाटी विजय :
प्रीमियर लीगमध्ये १६ व्या स्थानावर असलेल्या वाॅटफाेर्ड टीमने सामन्यात सनसनाटी विजयाची नाेंद केली. या संघाने सामन्यात मँचेस्टर युनायटेडला पराभूत केले. वाॅटफाेर्डने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला.

ओलेचे मार्गदर्शन; टीमचे यश
109 सामने
58 विजय
24 पराभव
27 अनिर्णित
डावपेचात अपयश; असंतुलित टीमने पराभवाची मालिका कायम
मँचेस्टर युनायटेडला लीगमधील सहा सामन्यांत सुमार खेळीमुळे पराभवाला सामाेरे जावे लागले. डावपेचातील अपयश आणि असंतुलितपणामुळेच टीम सातत्याने अपयशी ठरत आहेत. प्रशिक्षक ओले गनर यांच्यामुळेही संघात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांनी काेणत्याही प्रकारचे सकारात्मक पद्धतीचे डावपेच आखण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यांची ही निरुत्साही खेळी टीम आणि खेळाडूंना अडचणीत आणणारी ठरली. यातून टीमला सामन्यागणिक लीगमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, हीच पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी त्यांनी काेणत्याही प्रकारचे ठाेस असे डावपेच आखले नाहीत. तसेच दुबळेपणावरही कधी भाष्य केले नाही.

यातूनच ही मालिका अशीच कायम राहिल्याने टीमने सहा सामने गमावले. तसेच खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांच्याकडे विशेष प्लॅनचा अभाव असल्याचा दिसून आला. ‘जय-पराजय हा हाेतच असताे. कधी आम्ही जिंकणार तर कधी प्रतिस्पर्धी. त्यामुळ खेळाडूदेखील माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक वेळीच यशस्वी हाेईल असेही नाही. त्यामुळे काेणालाही दाेष देता येत नाही,’ अशा शब्दांत ओले गनर यांनी प्रतिक्रिया दिली हाेती. यातूनच त्यांना संघाच्या पराभवाबद्दल काेणत्याही प्रकारची खंत वाटत नव्हती. तसेच खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ते कधीही आग्रही नव्हते

७५ काेटी देऊन गनर यांना निराेप
पराभवाची मालिका खंडित हाेत नसल्याने प्रशिक्षक ओले गनर यांना पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे करार संपुष्टात येण्यापूर्वीच गनर यांना हे पद साेडावे लागणार आहे. यातून युनायटेड क्लब ७५ काेटी रुपये देऊन गनर यांना निराेप देणार आहे. ते सर्वाधिक मानधन मिळवणारे इंग्लंडचे पाचवे प्रशिक्षक आहेत.

बातम्या आणखी आहेत...