आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 World Cup, Sri Lanka Stay In Race For Semi finals; Afghanistan Team Pack Up

टी-20 विश्वचषक:श्रीलंका संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम; अफगाणिस्तान संघाचे पॅकअप

ब्रिस्बेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर हसरंगा (३/१३) आणि धनंजया डिसिल्वाने (६६) नाबाद अर्धशतकी खेळीतून श्रीलंका संघाच्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या. शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने मंगळवारी अ गटामध्ये दुसरा विजय साजरा केला. एशियन चॅम्पियन श्रीलंका संघाने गटातील आपल्या चाैथ्या सामन्यात अफगाणिस्तान टीमवर ६ गड्यांनी मात केली. यासह श्रीलंका संघाने उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ८ बाद १४४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने १८.३ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली.

संघाच्या विजयासाठी धनंजया डिसिल्वाने झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसेच कुशल मेंडिस (२५), असलंका (१९) आणि भानुका राजपक्षेने (१८) माेलाचे याेगदान दिले. यासह श्रीलंका संघाला आपला विजय साजरा करता आला. अफगाणिस्तान संघाकडून मुजीब रहमान आणि राशिद खानने प्रत्येकी दाेन बळी घेतले. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला दुसऱ्या पराभवाने स्पर्धेतून पॅकअप करावे लागले.

बातम्या आणखी आहेत...