आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांचा इतिहास साक्षीदार:वर्ल्डकपमध्ये जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान सामना झाला, तेव्हा-तेव्हा भारताने चारली पाकिस्तानला धूळ, वाचा पाचही सामन्यांचे किस्से

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरता आता सगळ्यांना लागली आहे. भारत-पाकिस्तान सामना हा 24 ऑक्टोंबरला होणार आहे. भारताने हा सामना हा रद्द यासाठी पाकिस्तान विशेष प्रयत्न करत असून, जम्मू काश्मीरमध्ये परराज्यातील नागरिकांची दहशतवादी हत्या करत आहे.

तसेच BCCI ला देखील हा सामना भारताने रद्द करावी अशी मागणी करत आहे. जर भारत पाकिस्तान सामना रद्द झाला तर? आणि जर फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमने सामने आले तर? गेल्या 9 वर्षात 5 वेळा भारत-पाकिस्तान सामना खेळण्यात आला आहे. त्याविषयी आपण अधिकची माहिती घेऊया...

पहिला सामना भारत-पाकिस्तान 14 सप्टेंबर 2007
2007 मध्ये टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना खेळण्यात आला होता. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही एकच ग्रुपमध्ये होते. त्यावेळी टीम इंडियाने फलंदाजी करत 141 धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ पाकिस्तानने देखील मोठ्या शक्तीने 141 धावांचा टप्पा गाठत सामना बरोबरीने सुटला होता. त्यानंतर सामन्याचा निकाल बॉल-आउटने झाला होता. भारताकडून त्यावेळी तीन थ्रो झाले होते. आणि टीम इंडिया जिंकली होती.

दुसरा सामना भारत-पाकिस्तान 24 सप्टेंबर 2007 जोहान्सबर्ग

पहिल्या टी-20 सामन्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या टी-20 च्या फायनलमध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा सामना पाहायला मिळाला. टॉस जिंकत भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीर याने 54 चेंडूमध्ये 75 धावा केल्या. त्यात त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. सोबत रोहित शर्माने देखील 16 चेंडूमध्ये 30 धावा लगावल्या.

भारताने 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 157 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने 77 धावांमध्ये आपले 6 जण गमावले. मात्र मिस्बाह उल हक हो शेवटपर्यंत खेळत राहिला. त्यावेळी पाकिस्तानला जिंकण्यासाठी फक्त 13 धावा पाहिजे होत्या. मात्र मिस्बाह 43 धावा करत बाद झाला. त्यामुळे अवघ्या 6 धावांनी भारताचा विजय झाला.

तिसरा सामना 30 सप्टेंबर 2012 कोलंबो
2012 च्या टी-20 वर्ल्डकपचे आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात आले होते. सुरुवाती फलंदाजी करत पाकिस्तानने 128 धावा करत टीम ऑलआउट झाली. तेव्हा लक्ष्मीपती बालाजीने कमालीचे गोलंदाजी करत पाकला तीन झटके दिले होते. विराट कोहलेनी 61 चेंडूमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देण्यात आले होते. भारताने 8 विकेट घेत सामना आपल्या बाजूने केला होता.

चौथा सामना ढाका 21 मार्च 2014
भारताला 2014 मध्ये झालेला हा सामना देखील भारतासाठी खुप सोपा ठरला. पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत 20 ओवरमध्ये 130 धावा केल्या. अमित मिश्राने कमालीची गोलंदाजी करत 22 धावांमध्ये 2 जणांना बाद केले. तेव्हा देखील कोहली टीम इंडियामध्ये सर्वात जास्त धावा काढणारा खेळाडू ठरला. अवघ्या 32 चेंडूमध्ये त्याने 36 धावा काढल्या होत्या.

5 वा सामना 19 मार्च 2016 कोलकत्ता

2016 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना कोलकत्तामध्ये पार पडला. त्यात पाकिस्तानने फलंदाजी करत 20 ओवरमध्ये फक्त 118 धावा काढल्या. तेव्हा टीम इंडिया फलंदाजीला आली तेव्हा सुरुवातीला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मोहम्मद आमिर आणि मोहम्मद समी यांनी टीम इंडियाचे तीन गडी बाद केले होते.

मात्र विराट कोहलीने 37 चेंडूमध्ये 55 धावा काढत पाकिस्तानच्या वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न उध्वस्त केले. कोहलीने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. तेव्हा टीम इंडिया हा सामना 6 धावांमूळे जिंकली होती.

बातम्या आणखी आहेत...