आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Take Up Badminton To Maintain Study play Balance; Training Under Lakshya Sen's Father, Now Junior World No. 1

मुलाखत - अनुपमा उपाध्याय:अभ्यास-खेळाचा समतोल राखण्यासाठी बॅडमिंटनला सुरुवात; आता ज्युनियर वर्ल्ड नं. 1

शेखर झा | नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या अनुपमा उपाध्यायने अभ्यास आणि खेळाचा समतोल राखण्यासाठी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आता कठोर परिश्रम आणि जिद्द यामुळे ती ज्युनियर स्तरावर जगातील नंबर १ बॅडमिंटनपटू बनली आहे. १७ वर्षांच्या अनुपमाने लक्ष्य सेनच्या वडिलांसोबत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. पहिली तीन वर्षे एकही सुटी न घेता सतत प्रशिक्षण दिले. अनुपमाच्या वडिलांनीही क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये नशीब आजमावले आहे. अनुपमा सांगतात, “सुरुवातीच्या दिवसांत मी सात ते आठ तास ट्रेन करायचो. आता त्याचे फळ मिळाले आहे.’ अनुपमा यांच्याशी झालेला संवाद...

-आपण खेळ कधी, कसा सुरू केला? अभ्यास आणि खेळ यांच्यात समतोल साधण्यासाठी माझ्या वडिलांनी मला बॅडमिंटन अकादमीत प्रवेश घेऊन दिला. तिथे मी सातत्याने चांगली कामगिरी करत होते. त्यानंतर त्यांनी अल्माेडा येथे लक्ष्य सेनचे वडील आणि प्रशिक्षक यांच्या अकादमीत पाठविले. येथूनच माझ्या बॅडमिंटन कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला मी रोज सात ते आठ सराव करायचे. पहिली तीन वर्षे कोणतीही सुटी न घेता प्रशिक्षण घेतले.

-ज्युनियर नंबर 1 झाल्यानंतर तुमचे पुढील ध्येय काय आहे? मी माझा सगळा वेळ बॅडमिंटनला देत आहे. मला ज्युनियरमध्ये जे मिळवायचे होते ते मला मिळाले आहे. आता मी वरिष्ठ पातळीवर लक्ष केंद्रित करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकाही महिला खेळाडूला बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळालेले नाही. माझे पुढील लक्ष ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि बॅडमिंटनमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणे हे आहे. यंदाही जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन तेथे पदक जिंकायचे आहे.

-बॅडमिंटनमध्ये तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण आहे? चांगली कामगिरी करणारा प्रत्येक खेळाडू आव्हान देऊ शकतो. मी थायलंडचा पिचा मौन आणि चीनचा वेंची शू यांना माझे प्रतिस्पर्धी मानते.

बातम्या आणखी आहेत...