आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:गांगुली राजीनामा देणार असल्याची चर्चा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. बुधवारी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘२०२२ हे वर्ष माझ्या क्रिकेट प्रवासाचे ३० वे वर्ष आहे. आता मला लोकांचे भले होईल असे काहीतरी करायचे आहे.’ यानंतर गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. पण काही वेळातच मंडळाचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले की, गांगुलीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही.

गांगुलीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझा क्रिकेट प्रवास १९९२ पासून सुरू झाला. २०२२ मध्ये ३० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुमचा पाठिंबा मिळाला आहे. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली व येथे पोहोचण्यासाठी मला मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आज मी काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखत आहे. माझी ही सुरुवात अनेकांना मदत करेल. तुमच्या समर्थनाची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...