आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tara Became The First Associate Country Player To Take Five Wickets In The T20 League In India

महिला प्रीमियर लीग:भारतात टी-20 लीगमध्ये पाच बळी घेणारी तारा ही पहिली असाेसिएट देशाची खेळाडू

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी सलामी; बंगळुरूवर ६० धावांनी मात

अमेरिकन वेगवान गाेलंदाज तारा नाॅरिसने (५/२९) चमकदार कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाला रविवारी महिला प्रीमियर लीगमध्ये सलामीला दणदणीत विजय मिळवून दिला. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने लीगमधील आपल्या पहिल्या सामन्यात महागड्या स्मृतीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूला धूळ चारली. दिल्ली संघाने ६० धावांनी सामना जिंकला. यादरम्यान सामनावीर ताराने लक्षवेधी कामगिरीतून विक्रमाला गवसणी घातली. भारतामधील टी-२० लीगमध्ये डावात ५ बळी घेणारी तारा ही पहिली असाेसिएट देशाची महिला गाेलंदाज ठरली. कर्णधार मेग लॅनिंग (७२) व शेफाली वर्माच्या (८४) दीड शतकी भागीदारीच्या बळावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना दाेन गड्यांच्या माेबदल्यामध्ये निर्धारित २० षटकांत २२३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला ८ गडी गमावत अवघ्या १६३ धावांपर्यंत मजल मारता आली.

बातम्या आणखी आहेत...