आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India Announced On The Day Of IPL Final, Africa's Tour Of India; A Series Of Five T20 Matches From June 9

आफ्रिकेचा भारत दौरा:IPL फायनलच्या दिवशीच टीम इंडिया जाहीर होणार; 9 जूनपासून पाच टी-20  सामन्यांची मालिका

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिका संघ पुढच्या जून महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये पाहुणा आफ्रिका आणि यजमान भारतीय संघांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका हाेणार आहे. याच मालिकेसाठी २९ मे रोजी यजमान भारतीय संघ जाहीर हाेणार आहे. याच दिवशी यंदाच्या सत्रातील आयपीएलची फायनल हाेणार आहे. येत्या ९ जूनपासून टी-२० मालिकेला सुरुवात हाेणार आहे. दिल्लीच्या मैदानावर सलामी सामना रंगणार आहे. त्यानंतर १२, १४, १७ आणि १९ जून रोजी टी-२० सामने हाेणार आहेत. या मालिकेतील सामने दिल्लीसह कटक, विशाखापट्टनम, राजकोट आणि बंगळुरूत आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दाेन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. डबलिन येथे २६ जूनला पहिला व २८ जूनला दुसरा सामना हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...