आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३ सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केले. मंगळवारी शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टॉपवर गेला आहे. भारत टी-२० मध्ये नंबर, १ तर कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने ९ गडी गमावून ३८५ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ ४१.२ षटकांत २९५ धावांत गारद झाला. शार्दूल ठाकूर प्लेअर ऑफ द मॅच, तर शुभमन गिल प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहे.
विक्रमांचा पाऊस
शुभमन गिल आणि रोहितने २१२ धावांची सलामी दिली. हा न्यूझीलंड विरोधातील वनडेमधील सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम आहे.
{११२ धावांची शतकी खेळी करणाऱ्या शुभमनने तिन्ही सामन्यांत एकूण ३६० धावा केल्या. पाकच्या बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली. {रोहितने ३० वे शतक केले. रिकी पाँटिंगच्या बरोबरीत आला. सचिन (४९) व विराटची (४६) त्यापेक्षा अधिक शतके आहेत. {न्यूझीलंडविरोधातील ९ बाद ३८५ ही भारताची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. या आधी ख्राइस्टचर्चमध्ये भारताने ४ बाद ३९२ धावा केल्या होत्या. {टीम इंडियाने १९ षटकार खेचले. २०१३ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९ षटकारांची बरोबरी केली. {पाचवा वनडे, ज्यात ३ ओपनर्सनी (शुभ, रोहित, कॉन्वे) शतक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.