आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर इंग्लँड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. गाबामध्ये विजय मिळवलेल्या संघातील 9 खेळाडूंना इंग्लँड दौऱ्यासाठी निवडण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर, 29 महिन्यानंतर हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले आहे. पांड्याने आपला अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लँडविरुद्ध खेळला होता.
दुखापतग्रस्त बुमराह आणि अश्विन कायम, इशांतची वापसी
दुखापतग्रस्त ईशांत शर्माची संघात वापसी झाली आहे. तसेच, चौथी कसोटी न खेळलेल्या जसप्रीत बुमराह आणि अश्विनला संघात कायम ठेवण्यात आले आहे. परंतु, तिसरी कसोटी ड्रॉ करणाऱ्या हनुमा विहारीला संधी मिळाली नाही.
पहिल्या 2 कसोटीसाठी 4 स्पिनर्सला संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे, पण डेब्यू टेस्टमध्ये 4 विकेट घेणाऱ्या आणि अर्ध शतक लगावणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला कायम ठेवण्यात आले आहे.
इंग्लँडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ
ओपनिंग: रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल
मिडल ऑर्डर: चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत,
ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल
वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर
स्पिनर: आर अश्विन, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल
स्टँडबाय: केएस भारत (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज़ नदीम, राहुल चाहर
नेट बॉलर्स: अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वारियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार
5 फेब्रुवारीला होईल पहिली कसोटी
भारत आणि इंग्लँडदरम्यान 4 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होईल. तर, पिंक बॉल टेस्टसह अखेरचे दोन टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम 'मोटेरा'मध्ये होतील. अखेरचे 3 वनडे सामने पुण्यात होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.