आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढच्या महिन्यात न्यूझीलंडमध्ये महिलांच्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. ही स्पर्धा मार्च आणि एप्रिलदरम्यान रंगणार आहे. ४ मार्च राेजी यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात सलामी सामना हाेणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत विजेत्यांवर जवळपास २६ काेटींच्या बक्षिसांचा वर्षाव हाेणार आहे. यातील विश्वविजेत्या महिला संघाचा १० काेटींच्या बक्षिसाने गाैरव करण्यात येईल.
गत स्पर्धेच्या तुलनेत या बक्षिसाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली. गत विश्वविजेत्या संघाला ५ काेटींचे बक्षीस देण्यात आले हाेते. त्यामुळे आता स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत ओव्हरऑल ७५ टक्के म्हणजेच ३.५ मिलियन डाॅलरची (२६ काेटी) वाढ झाली आहे. उपविजेता संघ हा ४.५३ काेटींच्या बक्षिसांचा मानकरी ठरणार आहे. गतवेळी या उपविजेत्या संघाचा २.७० लाख डाॅलर देऊन गाैरव करण्यात आला हाेता. गतवेळी भारतीय महिला संघ उपविजेता ठरला हाेता. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी २.२६ काेटी रुपये मिळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.