आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर कुलदीप यादव (३/७३) आणि अक्षर पटेलने (४/७७) भारतीय संघाचा रविवारी यजमान बांगलादेश संघाविरुद्ध कसाेटीत माेठा विजय साजरा केला. टीम इंडियाने सलामीच्या कसाेटीमध्ये बांगलादेश संघाला धूळ चारली. लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १८८ धावांनी सलामीची कसाेटी जिंकली. भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या ५१३ धावांचा पाठलाग करताना दमछाक झालेल्या बांगलादेश संघाला दुसऱ्या डावात ३२४ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. संघाकडून घरच्या मैदानावर सलामीवीर शांताे (६७), हसन (१००) आणि कर्णधार शाकीबला (८४) माेठी खेळी करता आली. इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर आपले आव्हान कायम ठेवता आले नाही. यातून बांगलादेश टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यातून भारताने करिअरमध्ये बांगलादेश टीमविरुद्ध कसाेटीमध्ये दहावा विजय साजरा केला. या दाेन्ही संघांत १२ कसाेटी सामने झाले. यातील दाेन कसाेटी सामने अनिर्णित राहिले.
सामनावीर कुलदीप यादवचे एकूण ८ बळी भारताच्या कुलदीप यादवने आपल्या शानदार गाेलंदाजीने चितगावच्या मैदानावरील सलामीची कसाेटी गाजवली. त्याने दर्जेदार खेळीत सातत्य ठेवताना कसाेटीत एकूण ८ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. या सर्वाेत्तम खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप : भारत दुसऱ्या स्थानी संघ सामने विजय पराभव ड्रॉ गुण विजयाची टक्केवारी ऑस्ट्रेलिया 13 9 1 3 120 76.92 भारत 13 7 4 2 87 55.77 द. आफ्रिका 11 6 5 0 72 54.55 श्रीलंका 10 5 4 1 64 53.33 इंग्लंड 21 9 8 4 112 44.44
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.