आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India's 12 Wins In 12 Years Against Zimbabwe, Opening Match To Be Played Today, Live Broadcast Of The Match From 12.45 Pm

वनडे मालिका:झिम्बाव्वेविरुद्ध टीम इंडियाचे 12 वर्षांमध्ये 12 विजय नाेंद,  आज रंगणार सलामी सामना, थेट प्रक्षेपण दु.12.45वा.

हरारे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेकेश राहुल आता आपल्या नेतृत्वाखाली झिम्बाव्वेविरुद्ध गत १२ वर्षांपासून कायम असलेल्या भारतीय संघाची विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि यजमान झिम्बाव्वे यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आज गुरुवारपासून सुरुवात हाेत आहे. हरारेच्या मैदानावर हे दाेन्ही संघ सलामी सामन्यात समाेरासमाेर असतील. भारताचे या सामन्यातील पारडे जड मानले जात आहे.

टीम इंडियाला गत १२ वर्षांत झिम्बाव्वे संघाविरुद्ध १२ विजय साजरे करता आले. भारताला ३ जून २०१० मध्ये या झिम्बाव्वेविरुद्ध शेवटचा पराभव पत्करावा लागला हाेता. त्यानंतर टीम इंडियाने आपली विजयी माेहीम आजतागायत कायम ठेवली आहे. भारत आणि झिम्बाव्वे संघांमध्ये १९८३ पासून आतापर्यंत ६३ सामने झाले. यातील ५१ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजयी पताका फडकवता आली. झिम्बाव्वेने फक्त १० सामने जिंकले. गंभीर दुखापतीतून सावरलेल्या लाेकेश राहुलकडे या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व साेपवण्यात आले. नियमित कर्णधार राेेहितसह काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे राहुलला विजयासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

काेचची राहुल-चहरवर खास नजर : मुख्य प्रशिक्षण राहुल द्रविड या दाैऱ्यावर नाही. त्यामुळे संघाच्या प्रशिक्षकपदी लक्ष्मणची नियुक्ती करण्यात आली. एनसीए अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ या वनडे मालिकेत खेळणार आहे. निवड समितीने काेच लक्ष्मणला या मालिकेदरम्यान खास करून राहुल आणि दीपक चहरवर लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे. सध्या हे दाेन्ही खेळाडू गंभीर दुखापतीमधून सावरलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...