आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्यकुमार यादवच्या (११२) शतकापाठाेपाठ अर्शदीप (३/२०), हार्दिक (२/३०), उमरान मलिक (२/३१) आणि चहलने (२/३०) सर्वाेत्तम गाेलंदाजीतून यजमान टीम इंंडियाला शनिवारी श्रीलंकेवर मालिका विजय मिळवून दिला. हार्दिकच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १६.४ षटकांत ९१ धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. भारतीय संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध २५ वा मालिका विजय साकारला. तसेच भारताने टी-२० फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक १९ वेळा श्रीलंकेचा पराभव केला आहे.
फाॅर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या झंझावाती खेळीतून यंदाच्या सत्रात टी-२० मध्ये शानदार पहिले शतक साजरे केले. त्याने शनिवारी पाहुण्या श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ११२ धावांची माेठी खेळी केली. शतकाच्या बळावर यजमान टीम इंडियाने राजकाेटच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात २२८ धावा काढल्या. खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंका संघाला १३७ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. भारताचे सूर्यकुमार सामनावीर व अक्षर मालिकावीर ठरले.
सूर्यकुमारचे सत्रात पहिले टी-२० शतक
भारतीय संघाकडून शुभमान आणि राहुल त्रिपाठीने (३५) संयमी खेळीतून डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान शुभमानने ३६ चेंडूंमध्ये ४६ धावा काढल्या. अवघ्या चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. तसेच राहुल त्रिपाठीने १६ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमारने ४५ चेंडूंमध्ये शतक साजरे केले. त्याने ५१ चेंडूंत ७ चाैकार व ९ षटकारांच्या आधारे ११२ धावा काढल्या.
धावफलक, नाणेफेक भारत (फलंदाजी)
भारत धावा चेंडू ४ 6
इशान झे.धनंजया गाे. दिलशान ०१ ०२ ०० ०
शुभमान गिल त्रि.गाे. हसरंगा ४६ ३६ ०२ ३
राहुल झे. दिलशान गाे. चमिका ३५ १६ ०५ २
सूर्यकुमार यादव नाबाद ११२ ५१ ०७ ९
हार्दिक झे.धनंजया गाे. रंजिथा ०४ ०४ ०० ०
दीपक झे. हसरंगा गाे. दिलशान ०४ ०२ ०१ ०
अक्षर पटेल नाबाद २१ ०९ ०४ ०
अवांतर : ०५, एकूण : २० षटकांत ५ बाद २२८ धावा. गडी बाद क्रम : १-३, २-५२, ३-१६३, ४-१७४, ५-१८९. गाेलंदाजी : दिलशान मदुशनाका ४-०-५५-२, कसून रंजिथा ४-१-३५-१, महिश थिक्षणा ४-०-४८-०, चमिका करुणारत्ने ४-०-५२-१, हसरंगा ४-०-३६-१.
श्रीलंका धावा चेंडू 4 6
निंस्साका झे.शिवम गाे. अर्शदीप १५ १७ ०३ ०
मेंडिस झे.उमरान गाे. अक्षर २३ १५ ०२ २
फर्नांडाे झे.अर्शदीप गाे. हार्दिक ०१ ०३ ०० ०
धनंजया झे.शुभमान गाे. चहल २२ १४ ०२ १
असलंका झे.शिवम गाे. चहल १९ १४ ०२ १
शनाका झे.अक्षर गाे. अर्शदीप २३ १७ ०० २
हसरंगा झे.दीपक गाे. उमरान ०९ ०८ ०१ ०
चमिका पायचीत गाे. हार्दिक ०० ०२ ०० ०
महिश थिक्षणा त्रि.गाे. उमरान ०२ ०५ ०० ०
कसून रंजिथा नाबाद ०९ ०४ ०२ ०
दिलशान त्रि.गाे. अर्शदीप ०१ ०२ ०० ०
अवांतर : १३, एकूण : १६.४ षटकांत सर्वबाद १३७ धावा. गडी बाद क्रम : १-४४, २-४४, ३-५१, ४-४८, ५-९६, ६-१०७, ७-१२३, ८-१२७, ९-१३५, १०-१३७. गाेलंदाजी : हार्दिक ४-०-३०-२, अर्शदीप सिंग २.४-०-२०-३, शिवम मवी १-०-६-०, अक्षर पटेल ३-०-१९-१, उमरान मलिक ३-०-३१-२, युजवेंद्र चहल ३-०-३०-२.
सामनावीर : सूर्यकुमार यादव मालिकावीर : अक्षर पटेल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.