आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India's Playing 11 For Test Series Announced; Team India Playing 11 For Australia Adelaide 1st Test; News And Updates

IND Vs AUS:कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 ची घोषणा; मयंक आणि पृथ्वी करणार ओपनिंग, तर साहाकडे विकेटकीपिंगची जबाबदारी

अॅडिलेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दौरा सोडून परत येणार विराट

अॅडिलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी (डे-नाइट)साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ओपनर असतील. ईशांत शर्माच्या अनुपस्थितीत उमेश यादव तिसरासह शमी, बुमराह आणि पेस डिपार्टमेंट सांभाळणार. रविचंद्रन अश्विन संघातील एकमेव स्पिनर आहे. परंतू, हनुमा विहारी अश्विनला साथ देऊ शकतो. तर, मिडल ऑर्डरमध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे असतील. हनुमा विहारी 6 आणि ऋद्धिमान साहाला 7 नंबरवर बॅटिंगसाठी पाठवले जाईल.

टीम इंडियाची प्लेइंग-11

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

जडेजाला संधी नाही

पहिल्या टी-20 मध्ये कन्कशन आणि हॅम स्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे ऑलराउंडर रविंद्र जडेजाला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. अशात, टीम इंडियाला हनुमा विहारीकडून चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे.

दौरा सोडून परत येणार विराट

विराट अॅडिलेड टेस्टनंतर आपल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परत येणार आहे. बोर्डाने विराटची पॅटरनिटी लीव्ह अप्रूव्ह केली आहे. दुसऱ्या टेस्टपासून रहाणे संघाचे नेतृत्व करेल.

रोहित तिसऱ्या टेस्टपासून संघात येईल

काही काळापासून फिटनेसमुळे चर्चेत असलेला रोहित शर्मा पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीला मुकनार आहे. मंगळवारी रोहित ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. तिसऱ्या कसोटीपासून तो मैदानात उतरू शकतो.

टेस्ट सीरीजचे शेड्यूल

मॅचतारीखव्हेन्यू
1st Test (डे नाइट)17-21 डिसेंबरअॅडिलेड
2nd Test26-30 डिसेंबरमेलबर्न
3rd Test07-11 जानेवारीसिडनी
4th Test15-19 जानेवारीब्रिस्बेन
बातम्या आणखी आहेत...