आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India's Sun Shone, Sunday Morning In Australia. India In The Semi finals As Africa Loses

टी-20 वर्ल्डकप:टीम इंडियाचा सूर्य तळपला, रविवारी सकाळी ऑस्ट्रेलियात द. आफ्रिका हरताच भारत उपांत्य फेरीत

मेलबर्नएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बांगलादेशला नमवत उपांत्य फेरीत पोहोचला पाक, ग्रुपमध्ये भारत टॉप

क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा दिवस खास राहिला. सकाळी झोपेतून उठताच पहिली नजर ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्समधील सामन्याच्या स्कोअरकडे गेली. या सामन्यात नेदरलँड्सने द. आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत करताच भारतापासून ते पाकिस्तानपर्यंत जल्लोष सुरू झाला. कारण पाकने बांगलादेशला नमवत उपांत्य फेरी गाठली. टीम इंडियाने सूर्यकुमारच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर (२५ चेंडूंत ६१ धावा) झिम्बाब्वे संघाला ७१ धावांनी पराभूत केले. यासोबतच टीम इंडियाच्या ‘सूर्यकुमार’चा उदयही झाला. कारण गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आणि आशिया चषकात भारताचा संघ दुसऱ्या फेरीतच बाहेर पडला होता.

टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या पाच षटकांत ७९ धावा केल्या. यामध्ये ५६ धावा एकट्या सूर्यकुमारच्या आहेत. 61 धावा 25 चेंडू 6 चौकार 4 षटकार

विचित्र योगायोग : १९९२ वनडे वर्ल्डकपसारखाच राहिला टी-२० वर्ल्डकपचा आतापर्यंतचा प्रवास {१९९२ वनडे वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठू शकला नाही. यंदाही मुकला. {तेव्हाही पाकिस्तान बाहेर होता-होता उपांत्य फेरीत पोहोचला होता. यंदाही असेच झाले. {तेव्हाही न्यूझीलंड ग्रुपमध्ये टॉपवर होता. उपांत्य फेरीत पाकशी भिडला. यंदाही तेच झाले. {तेव्हा न्यूझीलंडला नमवून पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली. यंदाही तो प्रबळ दावेदार आहे.

सहा धक्कादायक निकाल : कमकुवत संघांनी ६ वेळा दिग्गजांना नमवत दिला आश्चर्याचा धक्का नामिबियाने श्रीलंकेला ५५ धावांनी नमवले. स्कॉटलंडने वेस्ट इंडीजला ४२ धावांनी हरवले. आयर्लंडने वेस्ट इंडीजला ९ गड्यांनी पराभूत केले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला केवळ १ धावेने नमवले. आयर्लंडने इंग्लंडला केवळ ५ धावांनी हरवले. नेदरलँड्सने द. आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत केले.

एक आणि एक अकराची जोडी : संघाच्या एकूण धावांपैकी ५६% एकट्या विराट-सूर्यकुमारच्या संघाच्या एकूण धावा८४२ विराट+सूर्याच्या धावा ४७१ संघाची एकूण अर्धशतके ९ विराट+सूर्याची फिफ्टी६ {एकूण संघाच्या ५६% धावा व ६७% अर्धशतके या दोन खेळाडूंनी केली आहेत.

विश्‍लेषण टी-२० वर्ल्डकप : भारताचा चौथ्यांदा अन् पाकचा सहाव्यांदा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश {एकूण ८ टी-२० वर्ल्डकप झाले. भारताने चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली. २००७ व २०१४ मध्ये अंतिम सामना खेळला. २००७ मध्ये पाकला नमवून भारत चॅम्पियन बनला. {पाकिस्तान सहाव्यांदा उपांत्य फेरीत स्थान मि‌ळवण्यात यशस्वी ठरला. २ वेळा अंतिम फेरी गाठली. २००९ मध्ये चॅम्पियनही बनला. {न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही टी-२० वर्ल्डकप जिंकला नाही, तर इंग्लंडने २०१० मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे. {२००७ नंतर कोणत्याही क्रिकेट वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रथमच भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी पोहोचले आहेत. {बुधवारी पाकने न्यूझीलंडला व गुरुवारी भारताने इंग्लंडला नमवले तर १३ नोव्हेंबरला भारत-पाक अंतिम सामना खेळतील.

टी-२० वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास... २००७ : उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवत अंतिम फेरी गाठली, चॅम्पियन. २००९ : सुरुवातीचे २ सामने जिंकल्यानंतर लागोपाठ तीन सामने गमावत बाहेर. २०१० : सुरुवातीचे २ सामने जिंकले, पण पुढचे ३ गमावून बाहेर व्हावे लागले. २०१२ : नेट रनरेट कमी पडला होता. २०१४ : उपांत्य फेरीत आफ्रिकेला हरवत अंतिममध्ये पोहोचला. श्रीलंकेकडून हार. २०१६ : उपांत्य फेरीत वेस्ट इंडीजने भारताला ७ गडी राखून पराभूत केले. २०२१ : उपांत्यमध्ये पोहोचला नाही. २०२२ : झिम्बाब्वेला नमवून सर्वाधिक ८ गुणांसह उपांत्य फेरी गाठली.

बातम्या आणखी आहेत...