आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Team India's Two Bowlers Took Four Wickets Each In A Single Match For The First Time

टी-20:टीम इंडियाच्या दाेन गाेलंदाजांनी एकाच सामन्यात पहिल्यांदाच घेतले प्रत्येकी चार बळी

नेपियर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-२० मालिका भारताच्या नावे; तिसरा सामना टाय, गाेलंदाज सिराज, अर्शदीपचे प्रत्येकी ४ बळी

यजमान न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यातील तिसरा शेवटचा टी-२० सामना टाय झाला. यासह भारताने ही तीन टी-२० सामन्यांची मालिका १-० ने आपल्या नावे केली. पावसामुळे सलामीचा सामना रद्द झाला हाेता. त्यानंतर भारताने दुसरा टी-२० सामना जिंकला. आता तिसऱ्या सामन्यात भारताच्या युवा गाेलंदाज सिराज (४/१७) आणि अर्शदीपने (४/३७) विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून पहिल्यांदाच दाेन गाेलंदाजांनी एकाच सामन्यात प्रत्येकी चार बळी घेतले आहेत.

भारताने यंदाच्या सत्रात चाैथी टी-२० मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारताने सत्रामध्ये इंग्लंड, आॅस्ट्रेलिया व द. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका आपल्या नावे केली आहे. भारताचा चाैथा व न्यूझीलंडचा नववा सामना टाय झाला आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीत १९.४ षटकांत १६० धावांवर आपला डाव गुंडाळला. पाठलाग करताना भारतीय संघाने ९ षटकांत चार गडी गमावत ७५ धावा काढल्या. यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर सामना टायचा निर्णय जाहीर करण्यात आला. भारताकडून इशानने १०, ऋषभ पंतने ११ धावांची खेळी केली. दरम्यान कर्णधार हार्दिकने १६६.६६ च्या स्ट्राइक रेटने १८ चेंडूंत नाबाद ३० धावा काढल्या.

शुक्रवारपासून वनडे मालिका : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता वनडे मालिका विजयाचीही माेहीम फत्ते करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. सलामीचा वनडे सामना आॅकलंडच्या मैदानावर हाेणार आहे. त्यानंतर २७ नाेव्हेंबरला दुसरा आणि ३० नाेव्हेंबरला तिसरा शेवटचा वनडे सामना हाेणार आहे. त्यामुळे भारतीय संघ वनडे मालिका विजयासाठी सत्राचा शेवट गाेड करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...