आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो ऑलिम्पिक:नेम धरला, पण नशिबाची हुलकावणी; पहिलीच संधी मनूने गमावली

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिव्हर बदलल्याने 18 मिनिटे मागे गेली मनू; 2 गुणांनी पराभूत

ऑलिम्पिकच्या दुसरा दिवस रविवारी भारताच्या पदरात कोणतेही पदक तर पडले नाही, पण अपेक्षा उंचावल्या गेल्या. १० इव्हेंट झाले. ५ इव्हेंटमध्ये खेळाडू पात्र ठरले. जगात नंबर २ असलेली नेमबाज मनू भाकरकडून मोठी अपेक्षा होती. परंतु १० मी. एअर पिस्टल स्पर्धेत मनूचे नशीब नेम धरण्यापूर्वीच हुकले. तिच्या पिस्टलच्या काॅकिंगचे लिव्हर तुटले. तथापि, तिला २७ आणि २९ जुलै रोजी संधी मिळणार आहे.

पप्पा, कदाचित मी जिंकावे असे नशिबालाच मान्य नसावे. तुम्ही काळजी करू नका. नशीब किती दिवस धोका देईल? मी ऑलिम्पिक मेडलिस्ट बनेलच. - मनू (वडील रामकिशन भाकर यांना)

लिव्हर बदलल्याने १८ मिनिटे मागे गेली मनू; २ गुणांनी पराभूत
मनूने १६ शूट केले असतानाच तिच्या पिस्टलचे कॉकिंग लिव्हर तुटले. याच भागात डार्ट टाकून चालवावे लागते. ते कुठल्याही स्थितीत बदलावेच लागणार होते. टीमकडे स्पेअर पार्ट असतात. आधी ग्रिप उघडले जाते. इलेक्ट्रिक सर्किट, स्क्रूसुद्धा काढावे लागतात. त्यानंतर लिव्हर बदलले जाते. फिट केल्यानंतर पुन्हा सर्किट तपासावे लागते आणि ग्रिप लावून पिस्टल तयार केले जाते. ट्रिगर खराब होणे किंवा डार्ट अडकणे ही सामान्य बाब आहे. पण लिव्हर कमीच खराब होते.

जेव्हा लिव्हर तुटले तेव्हा मनूचे ४४ शॉट्स आणि ५६ मिनिटे उरली होती. १८ मिनिटांनंतर ती परतली तेव्हा तिला ३८ मिनिटांत ४४ शूट करावे लागणार होते. चौथ्या क्रमांकावर असलेली मनू आता मागे पडली होती. तिला एक्स्ट्रा टाइम मिळाला नाही आणि उरलेल्या वेळेतच खेळ संपवावा लागला. त्यानंतरही मनूने कमी वेळेत क्वालिफाइंग राउंड पूर्ण केला. ६० शॉट्सनंतर ५७५ गुण मिळवले. कटऑफ ५७७ होता. अंतिम शूट ८ पॉइंटवर लागला. तो १० किंवा १० प्लस असता तर ती फायनलमध्ये राहिली असती. मनूने पिस्टल न बदलता ती दुुरुस्त करण्याचा योग्य निर्णय घेतला. कारण शूटरची ग्रिप त्याच पिस्टलवर बसलेली असते. सहा महिन्यांपूर्वीच तिने ते घेतले होते.

मेरी कोम व मणिकामुळे पदकाच्या आशा उंचावल्या
बॉक्सिंग:
डोमेनिकाच्या हर्नांडेज गार्सियाला हरवून मेरी कोम प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली. पुढील सामना २९ जुलै रोजी.
हॉकी : पुरुष हॉकी टीम ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने हरली. हा भारताचा वाईट पराभव. भारताचे आणखी तीन सामने बाकी आहेत.
टेबल टेनिस : मणिका तिसऱ्या फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय. मणिकाने वर्ल्ड नंबर-३२ च्या खेळाडूला हरवले.

बातम्या आणखी आहेत...