आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविंडीज संघाच्या फाॅर्मात असलेल्या तेगनारायण चंद्रपाॅलने (नाबाद २०७) साेमवारी झिम्बाव्वेविरुद्ध सलामी कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार द्विशतक साजरे केले. विंडीज संघाला ६ गड्यांच्या माेबदल्यात ४४७ धावांवर आपला पहिला डाव घाेषित करता आला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाने दिवसअखेर ३ बाद ११४ धावा काढल्या. त्यामुळे या संघाची निराशाजनक सुरुवात झाली. अद्याप संघ ३३३ धावांनी पिछाडीवर आहे.
विंडीजकडून क्रेग ब्रेथवेटने (१८२) दीड शतक केले. त्यामुळे संघाला धावांचा डाेंगर रचता आला. चंद्रपाॅलच्या मुलगा तेगनारायणची नाबाद द्विशतकी खेळी लक्षवेधी ठरली. यासह त्याने वडिलांच्या द्विशतकी खेळीच्या कामगिरीला उजाळा दिला. यातून गत ३३ वर्षांत द्विशतक साजरे करणारी चंद्रपाॅल व तेगनारायण ही विंडीजची पहिलीच बाप-लेकाची जाेडी ठरली आहे. तसेच जगातील दुसरी जाेडी ठरली. शिवनारायण चंद्रपाॅलने २००५ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध द्विशतक साजरे केले हाेते. पाक संघाच्या हनीफ आणि शाेएब या दाेघांनीही हा पराक्रम गाजवलेला आहे.
तेगनारायण व ब्रेथवेट या जाेडीने संघाला ३३६ धावांच्या भागीदारीची दमदार सलामी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.