आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tejas Shirse Gold Medal In 60th National Open Athletics Championships; News And Live Updates

औरंगाबादचा तेजस शिर्से चॅम्पियन:60 व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक; 19 वर्षीय तेजसने पदार्पणात पटकावले सीनियर गटात सुवर्णपदक

वारंगळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेहनतीतून गाठले सोनेरी यश : मोदी

नॅशनल रेकॉर्ड होल्डर धावपटू तेजस शिर्से 60 व्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने शुक्रवारी स्पर्धेतील 110 मीटर हर्डल्स गटात सोनेरी यशाचा पल्ला गाठला. तेजसने 14.09 सेकंदांत हे अंतर गाठून सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. औरंगाबादच्या 19 वर्षीय तेजसने पदार्पणातच सीनियर गटातील अॅथलेटिक्स स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. त्याने गत महिन्यात 19 व्या फेडरेशन कप स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर 45 दिवसांत त्याने दुसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.

वारंगळ येथील स्पर्धेच्या 110 मीटर हर्डल्स गटात तेजसने आपले वर्चस्व कायम ठेवताना सोनेरी यश संपादन केले. यादरम्यान त्याने सर्व्हिसच्या सचिन बानू आणि तरुणदीप भाटियाला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. त्यामुळे सचिनला रौप्य आणि तरुणदीपला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गत महिन्यात फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तेजसने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. या स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली.

मेहनतीतून गाठले सोनेरी यश : मोदी
तेजस हा खूप मेहनती खेळाडू आहे भविष्यात तो अतिशय चागली कामगिरी करेल यांची मला खात्री आहे. परंतु, औरंगाबाद शहरात सिथेंटिक ट्रॅक नसल्यामुळे असे अनेक तेजस त्याच्या प्रतीक्षेत आहे. माझी शासनाला अशी नम्र विनंती आहे की, त्यांनी लवकरात लवकर सिंथेटिक ट्रॅक तयार करावा. यातून औरंगाबादमध्ये अनेक गुणवंत धावपटू तयार होतील. - सुरेंद्र मोदी, कोच

बातम्या आणखी आहेत...