आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:एलिसची 75 मिनिटांत विजयी सलामी; मार्टिना बाहेर

अबुधाबी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्जियमच्या महिला टेनिसपटू एलिस मर्टेन्सने साेमवारी अबुधाबी आेपन टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या गटात ७५ मिनिटांमध्ये विजयी सलामी दिली. तिने सलामी सामन्यात इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनवर ६-०, ६-० ने मात केली. यासह तिला पुढच्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. आता तिच्यासमाेर दुसऱ्या फेरीत चाैथ्या मानांकित वेराेनिकाचे आव्हान असेल. बेल्जियमच्या एलिसने किताबाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यातून तिने दाेन सेटमध्ये एकतर्फी विजय साजरा केला. इटलीच्या मार्टिना सपशेल अपयशी ठरली.

बातम्या आणखी आहेत...