आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील माजी नंबर वन टेनिसपटू राफेल नदाल सध्या गंभीर दुखापतीमुळे प्रचंड त्रस्त आहे. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपननंतर एकही स्पर्धेत सहभागी हाेता आले नाही. याच दुखापतीमुळे आता ताे यंदाच्या सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. त्याचा या स्पर्धेतील सहभाग अद्यापही अनिश्चित मानला जात आहे. यादरम्यान त्याने आता माँटे कार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. कंबरेच्या दुखापतीमुळे ताे या स्पर्धेत सहभागी हाेऊ शकत नाही. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेला सुुरुवात हाेणार आहे. नदालला याच दुखापतीचा माेठा फटका क्रमवारीतही बसत आहे. यामुळे त्याची क्रमवारीत सातत्याने घसरण हाेत आहे. गत आठवड्यात ताे पुरुष एकेरीच्या टाॅप-१० मधून बाहेर पडला आहे. आता ताे सध्या १४ व्या स्थानावर आहे. नदालच्या नावे ११ वेळा माेंटे कार्लाे टेनिस स्पर्धेतील किताबाची नाेंद आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.