आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस स्पर्धा:रिया, अदिबला सुवर्ण; , वृंदिकाला दाेन पदके

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंत टेनिस अकादमीतर्फे आयोजित मराठवाडास्तरीय टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रिया कुलकर्णी, अदिब मोहंमद, वृंदिका राजपूत, आशुतोष कवाडकर यांनी सुवर्णपदक पटकावले. गुरुकृपा अर्बनचे अध्यक्ष रामसिंग बहुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस प्रदान करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पदक विजेते: १० वर्षे मुले - संघर्ष देवी (प्रथम), नील (द्वितीय). मुली - रिया कुलकर्णी, सृष्टी दत्ता पुरे. १२ वर्षे मुले - अदिब मोहंमद, विश्वास सी. मुली - अक्षरी मांडलिक, रिया कुलकर्णी. १४ वर्षे मुले - शिवराज जाधव, कृष्णा राणी. मुली - वृंदिका राजपूत, सृष्टी मिरगे. १८ वर्षे मुले - आशुतोष कवाडकर, देवेश वाडिया. मुली - एम. शेख, वृंदिका राजपूत. स्पर्धेत वृंदिकाने दुहेरी यश मिळवले. तिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...