आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Test Cricket |: England Mathews' 14th Century; A Chance For The New Zealand Team To Win!

कसाेटी क्रिकेट:अँग्लाे मॅथ्यूजचे 14 वे शतक; न्यूझीलंड संघाला विजयाची संधी!

ख्राइस्टचर्च |13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान न्यूझीलंडविरुद्ध सलामी कसाेटीमध्ये फाॅर्मात आलेल्या श्रीलंकन फलंदाज अँग्लाे मॅथ्यूजने शानदार शतक साजरे केले. त्याने ११५ धावांची शानदार खेळी केली. याच शतकाच्या बळावर श्रीलंका संघाने सलामी कसाेटीच्या दुसऱ्या डावामध्ये ३०५ धावा काढल्या. यातून श्रीलंका संघाने रविवारी यजमान न्यूझीलंड टीमला विजयासाठी २८५ धावांचे टार्गेट दिले. प्रत्युत्तरामध्ये न्यूझीलंड संघाने चाैथ्या दिवसअखेर १ बाद २८ धावा काढल्या आहे. आता यजमान संघाला शेवटच्या दिवशी साेमवारी २५७ धावांची गरज आहे. तसेच श्रीलंका संघाला विजयासाठी ९ विकेट घ्याव्या लागणार आहेत. श्रीलंका संघाने कालच्या ३ बाद ८३ धावांवरून रविवारी खेळण्यास सुरुवात केली. संघाकडून मॅथ्यूज आणि दिनेश चांदिमलने शतकी भागीदारी केली. त्यामुळे संघाच्या धावसंख्येला गती िमळाली.

बातम्या आणखी आहेत...