आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का ?:क्रिकेट आधी टेटे, फुटबाॅल नॅशनल्स खेळला ब्रायन लारा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराची आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. टी-२० मध्ये तो प्रथमच मुख्य प्रशिक्षक झाला आहे.

‘प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन’ या नावाने लारा लोकप्रिय आहे. ११ भावंडांमध्ये लाराचा क्रमांक दहावा. वडील आणि बहिणीने त्याला ६ वर्षांचा असतानाच स्थानिक हार्वर्ड कोचिंग क्लिनिकमध्ये पाठवले होते. त्यामुळे फलंदाजीचे त्याचे तंत्र बालपणापासूनच खूप चांगले होते. - त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ट्रिनिटी क्रॉस, ऑर्डर ऑफ द कॅरेबियन कम्युनिटी आणि ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कारांनी लारा सन्मानित आहे.

-बीबीसी ओव्हरसीज स्पोर्ट््स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराचा मान मिळवणारा लारा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. याशिवाय सर गारफिल्ड सोबर्स (वेस्ट इंडीज) आणि शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) या दोघांना हा सन्मान मिळाला आहे.

- तो जगातील पाचव्या क्रमांकाचा धनाढ्य क्रिकेटपटू असून त्याची संपत्ती ४७८ कोटी रुपये आहे. विंडीजचा क्रिकेटपटू डॅरेन ब्रावो हा लाराचा पुतण्या आहे. सन २००९ मध्ये लाराचे आत्मचरित्र ‘बीटिंग द फील्ड : माय ओन स्टोरी’ प्रकाशित झाले.

-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ मध्ये त्रिनिदाद-टोबॅगोचा दौरा केला होता. त्यावेळी लाराची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्याचा ‘क्रिकेटचा मायकेल जॉर्डन’ अशा शब्दात गौरव केला होता.

क्रिकेट व्यतिरिक्त लारा फुटबॉल आणि टेबल टेनिसही उत्तम खेळायचा. त्याने राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धामध्ये त्रिनिदाद-टोबॅगोचे प्रतिनिधित्वही केले आहे.

-लाराच्या आईचे २००२ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये कर्करोग रुग्णालय उभारले आहे.

बातम्या आणखी आहेत...