आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The 19 year old Alcarez Is The Youngest To Reach A Grand Slam Final Since 2005 \ Marathi News

यूएस ओपन:19 वर्षीय अल्कारेज 2005 नंतर ग्रँडस्लॅमची फायनल गाठणारा सर्वात युवा

औरंगाबाद / मॅथ्यू फॅटरमॅन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनच्या १९ वर्षीय कार्लाेस अल्कारेजने विक्रमी कामगिरीसह यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. त्याने पुरुष एकेरीच्या गटाची फायनल गाठली. यासह ताे २००५ नंतर ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची फायनल गाठणारा सर्वात युवा टेनिसपटू ठरला. तसेच मेजर फायनलमधील आपले स्थान निश्चित करणारा ताे ओव्हरऑल आठवा युवा टेनिसपटू ठरला आहे. आता तिसऱ्या मानांकित पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये यजमान अमेरिकेच्या फ्रान्सिस तियाफाेवर मात केली. त्याने चार तास १८ मिनिटांच्या मॅरेथाॅन लढतीत ६-७, ६-३, ६-१, ६-७, ६-३ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याला आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला.

पुरुष एकेरीच्या गटातील विजेता ठरेल नंबर वन टेनिसपटू
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे आता अंतिम फेरी गाठणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे. कारण, चॅम्पियनच्या बहुमानासह विजेत्याला जगातील नंबर वन टेनिसपटू हाेण्याचा पराक्रम गाजवता येणार आहे. पुरुष एकेरीची फायनल जिंकणारा टेनिसपटू हा नंबर वन ठरेल.

अल्कारेजसमाेर आता रुड कॅस्पर
आता अल्कारेजसमाेर फ्रेंच ओपनच्या उपविजेत्या कॅस्पर रुडचे आव्हान असेल. रुडने उपांत्य सामन्यात कारेन खाचानाेववर मात केली. त्याने ७-६, ६-२, ५-७, ६-२ ने सामना जिंकला. आता रुडचा सामना अल्कारेजशी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...