आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा - पोर्तुगाल 16 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत:रोनाल्डोच्या जागी खेळलेल्या 21 वर्षीय रामोसने जिंकून दिला सामना

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा वर्ल्डकपमध्ये मंगळवारी रात्री पोर्तुगालने स्वित्झर्लंडला ६-१ ने नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. १४ वर्षांनंतर हा संघ रोनाल्डोशिवाय खेळला. त्याच्या जागी खेळलेल्या रामोसने यंदाची पहिली हॅट्रिक करत विजय मिळवून दिला.

इतिहास... बदलला {२००८ नंतर प्रथमच रोनाल्डो एखाद्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यात उतरला नाही. {२००६ नंतर प्रथमच पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. {प्रथमच पोर्तुगालच्या २१-२३ वर्षांच्या खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये ७ गोल केले.

इतिहास... घडवला {२१ वर्षीय रामोस वर्ल्डकपमध्ये हॅट्रिक करणारा सर्वात तरुण. {सर्वात वयस्कर ३९ वर्षीय पेपेचा कर्णधार म्हणून हेडरद्वारे गोल. {पोर्तुगालचा वर्ल्डकपच्या बाद फेरीत सर्वात मोठा विजय.

तिकडे... ७१व्या मिनिटाला क्रिस्टियानो रोनाल्डोची एंट्री {प्रशिक्षकाशी वाद झाल्यानंतर पोर्तुगालने कर्णधार रोनाल्डोलाच प्लेइंग-११ मधून बाहेर केले. नंतर हा आमच्या धोरणाचा भाग आहे, असे स्पष्टीकरण प्रशिक्षकांनी दिले. {क्रिस्टियानो रोनाल्डोला सामन्याच्या ७१व्या मिनिटाला संधी दिली, परंतु तो गोल करू शकला नाही. {यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोनाल्डोचा सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश.

बातम्या आणखी आहेत...